दिराचे अत्याचार , पतीचे अनैसर्गीक संबंध सासू – नणंद यांच्या कडे तक्रार केल्यावर ही फरक नाही

कल्याण / नवप्रहार डेस्क
3 मे 2014 रोजी तिचे लग्न झाले होते. 2022 पर्यंत तिचा संसार आनंदात सुरू होता . पण तिच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली काय माहित. त्यांनतर तिच्यावर अत्याचार सुरू झाले. दिराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.तर पती देखील तिच्या सोबत अनैसर्गिक संबंध ठेवायचा. तिने या बहत सासू आणि नणंद यांच्या कडे तक्रार केली. त्यांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले. 30 वर्षाच्या या महिलेने यानंतर आपल्या आईला हा सगळा प्रकार सांगितला. त्यांनतर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा पती तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवायचा. यानंतर महिलेने याची तक्रार तिची सासू आणि नणंदेकडे केली, पण दोघींनी यावर काहीही केलं नाही. 20 डिसेंबर 2024 साली महिलेच्या नणंदेच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यादिवशी महिला एकटीच घरी होती, याचा फायदा घेऊन दिराने तिच्यावर अत्याचार केले.
दिराच्या या गैरवर्तनाबद्दल महिलेने तिच्या पतीकडे तक्रार केली, पण पतीने भावाला याचा जाब विचारला नाही. उलट आपणही भावाच्या बायकोसोबत गैरवर्तन करू, असं पतीने महिलेला सांगितलं. अखेर महिलेने हा सगळा प्रकार आईला सांगितला, त्यानंतर महिलेचा भाऊ तिला माहेरी मुंब्र्याला घेऊन गेला. याप्रकरणी एका महिला समाजवेसिकेच्या सहाय्याने पती आणि दिरासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जबरदस्ती लग्न करून पाशवी अत्याचार
दुसरीकडे कल्याणच्या जवळच असलेल्या उल्हासनगरमध्ये पतीने पत्नीवर सिगरेटचे चटके देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2021 साली फेसबुकच्या माध्यमातून महिला आणि पुरुषाची मैत्री झाली, त्यानंतर दोघंही एका लॉजवर गेले. पुरुषाने लॉजवर चोरून महिलेचे प्रायव्हेट व्हिडिओ काढले. माझ्याशी लग्न केलं नाही तर हे करण्याची धमकीही त्याने दिली.
घाबरलेल्या महिलेने या पुरुषासोबत लग्न केलं, पण तरीही अत्याचार काही कमी झाले नाहीत. पती आणि सासूने पीडित महिलेला सिगरेटचे चटके दिले तसंच तिला गरम तव्यानेही मारलं. आरोपीने महिलेचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि तिच्या इतर कागदपत्रांचा गैरवापर करून कर्जही घेतलं. तसंच वडिलांकडून पैसे आणले नाहीत तर करण्याची धमकीही तिला दिली गेली. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.