नंददीप’च्या ईश्वरीय कार्याला वंदन – दिनेश गंधे
‘
व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने प्रभुजींना ब्लॅंकेटचे वाटप
सामाजिक भान जपत पत्रकार दिन साजरा
यवतमाळ : देवाच्या स्थानी नंददीपचे कार्य पाहतो.त्यांच्याकडून सुरु असलेल्या या ईश्वरीय कार्याला वंदन असे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे यांनी संदीप व नंदिनी शिंदे या दाम्पत्याच्या मनोरुग्ण सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.नंददीप येथे सोमवारी आयोजित पत्रकार दिनानिमित्य ब्लॅंकेट वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
६ जानेवारीला पत्रकार दिनाच्या औचित्यावर समर्थवाडीस्थित नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातील १४९ उपचाराधीन मनोरुग्णांना ब्लॅंकेट वाटप करून व्हॉइस ऑफ मीडियाशी संलग्नित पत्रकार बांधवांनी समाजभान जपले.आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्य आयोजिलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे,अनिरुद्ध पांडे,नितीन पखाले,राजकुमार भीतकर,अविनाश साबापुरे, संजय राठोड तसेच किशोर जुनूनकर उपस्थित होते.याप्रसंगी गंधे यांनी आपल्या मनोगतातून शिंदे दाम्पत्याच्या सेवाकार्याची स्तुती करीत या सामाजिक कार्याला आम्हा पत्रकारांची साथ राहील,असे अभिवाचन दिले.पत्रकारांच्या लेखणीमुळेच हे सेवाकार्य पुढे जात असून यास लोकचळवळ लाभत आहे,नंददीपला आजपर्यंत मिळालेले सर्व पुरस्कार हे पत्रकारांचे आहे,असे म्हणनू शिंदे यांनी पत्रकारितेचा गौरव केला व उपस्थितांचे आभार मानले.यावेळी सुरज पाटील,पवन लताड,रुपेश उत्तरवार,संजय राठोड,जय राठोड,मकसूद अली तसेच श्याम दांडेकर उपस्थित होते.