मॅरेथॉन – चीमुकल्यांपासुन व्रद्धांपर्यंत २७०० धावकांचा सहभाग, राज्यभरातुन आले धावक
यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचे तीसरे पर्व,
प्रतिनिधी | यवतमाळ
गेल्या अनेक दिवसांपासुन यवतमाळकरांना प्रतिक्षा असलेली यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन रविवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळी पार पडली. गोधनी मार्गावरील जिल्हा क्रीडा संकुलातुन सुरूवात झालेली ही मॅरेथॉन त्याच ठिकाणी परत येवुन समाप्त झाली. या स्पर्धेत शहरवासीयांसह राज्यभरातील विविध शहरातुन आलेल्या सुमारे २७०० पेक्षा अधीक धावकांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रत्यक्ष सहभाग घेतला. यामध्ये लहान मुलांपासुन वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत सर्वांचाच समावेश होता.
कॉटनसीटी रनर्स असोसीएशनच्या पुढाकारात वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस दल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शरिरिक शिक्षक संघटना, श्रमिक पत्रकार संघ या सर्वांच्या सहकार्यातुन यंदा यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचे तीसरे पर्व आयोजीत करण्यात आले होते. एक धाव पर्यावरणासाठी हे ब्रीदवाक्य धरुन यंदा पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी हजारो धावक रस्त्यावर उतरले होते. वर्ल्ड मॅरेथॉन ऑरर्गनायझेशनकडुन परवानगी घेवुन त्यांनी प्रमाणीत केलेल्या मार्गावर यवतमाळ मॅरेथॉन पार पडली. २१, १०, ५ आणि ३ किलोमिटर या गटांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत एकुण २ हजार ७०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी नोंदनी केली होती. यामध्ये प्रामुख्याने कारंजा, गडचीरोली, अमरावती, वर्धा, परभणी, छत्रपती संभाजी नगर, पूणे, मुंबई, नागपूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. पहाटे ५ वाजता मैदानावर स्पर्धक येण्यास सुरूवात झाली. त्या ठिकाणी स्पर्धकांनी विविध गितांच्या तालावर झुंबा डांस करुन वार्मअप केला. दरम्यान, सकाळी ६ वाजता २१ किलोमिटर स्पर्धेला हिरवी झेंडी देण्यात आली. त्यसानंतर दर १० मिनीटांच्या अंतराने सर्व गटातील स्पर्धक रवाना झाले. हिरवी झेंडी दाखवण्यात आली त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, पुसद उपविभागीय अधिकारी भाप्रसे हर्षवर्धन, पुसद उपविभागीय अधिकारी भाप्रसे दारव्हा चुलूमुल्ला रजनीकांत, उपजिल्हाधिकारी नांदेड ललीतकुमार वऱ्हाडे, मॅरेथॉनचा ब्रँन्ड अँबेसीडर देव चौधरी, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, तहसीलदार योगेश देशमुख, एलसीबी प्रमुख सतिश चवरे, वाहतुक शाखा प्रमुख ज्ञानोबा देवकते, कॉटनसीटी रनर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. परेश गंडेचा, सचिव डॉ. शरद राखुंडे, कोषाध्यक्ष डॉ. उमेश जोगे, डॉ. निशांत चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याच मान्यवरांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण करण्यात आले. यावेळी स्पर्धकांना रोख पारितोषीकांचे वितरण करण्यात आले.
चौकट
चौकाचौकात स्पर्धकांचे स्वागत
सकाळपासुन स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुला शालेय विद्यार्थी उभे होते. त्यांनी टाळ्या वाजवुन स्पर्धकांचा उत्साह वाढविला. यावेळी नागरिक देखील मोठ्या संखेने उपस्थित होते. चौकाचौकात घोषपथके, डीजे लावुन स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यात येत होता. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ठिकठिकाणी धावकांचे स्वागत करण्यात आले.
चौकट
८५ वर्षीय आजीने वेधले लक्ष
हेल्थ मेरॅथॉनमध्ये दारव्हा येथील ८५ वर्षीय आजी कमलाबाई नवरंगे ह्या सुद्धा धावल्या. तीन किलोमिटर फनरमध्ये धावून आजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पाच सुनाही या मॅरेॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यासोबतच एका पायाने अपंग असलेले विनायक हे या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांची ही १० वि मॅरेथॉन स्पर्धा होती.
सहभागी धावपटूंचाही मेडल देवून सन्मान
हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात शहरातील विविध संस्था, संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला होता. एकूण दोन हजार १०० धावपटूंनी अधिकृत नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या वयोवृद्ध, बालकांसह सर्वच स्पर्धकांना चीप टायमिंग सीस्टर, टी-शर्ट, गुडी बॅग, आदी साहित्याचे वाटप केले होते. दरम्यान, सहभागी धावपटूंचाही मेडल देवून सन्मान करण्यात आला.