क्राइम

एकच फ्लॅट अनेकांना विकणाऱ्या आणि बँकांना गंडविणारा नटवरलाल पोलिसांच्या जाळ्यात 

Spread the love

मूहाना / क्राईम रिपोर्टर

                एकच फ्लॅट तीन लोकांना विकून त्यांची फसगत करणाऱ्या आणि तोच फ्लॅट बँक आणि फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून लाखो रुपये कर्ज घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य म्हणजे हा आरोपी बीएमडब्ल्यू कार मधून कचरा टाकण्यासाठी आला होता.आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पोलिसांनी अटक केलेल्या या नटवरलालचं नाव देवेंद्र सिंगल उर्फ देवेंद्र सिंग आहे. देवेंद्रने तीन वेगवेगळ्या लोकांना एकच फ्लॅट विकून त्याची नोंदणी केली आणि कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पोहोचले तेव्हा तो बीएमडब्ल्यूमधून कचरा टाकण्यासाठी जात होता. मागच्या बऱ्याच दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. लक्ष्मण प्रसाद शर्मा यांनी जयपूरच्या मुहाना पोलीस ठाण्यात फ्लॅट खरेदीत गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाची माहिती देताना मुहाना पोलीस स्टेशनचे सीआय मदनलाल कडवसरा म्हणाले, ‘देवेंद्र सिंघलला फ्लॅट विकण्याच्या नावाखाली 50 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण प्रसाद शर्मा यांनी महिनाभरापूर्वी देवेंद्र सिंघल यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. लक्ष्मणने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, देवेंद्रने आपल्याला 50 लाख रुपयांना फ्लॅट दिला पण आरोपीने तो फ्लॅट इतर लोकांनाही विकला.

कडवासरा पुढे म्हणाले, ‘सुरुवातीच्या तपासात असे समोर आले आहे की, देवेंद्र सिंहने हा फ्लॅट तीन लोकांना आधीच विकला आहे. देवेंद्रने त्याच्याकडून पैसेही घेतले आहेत. देवेंद्रचे कारनामे इथेच थांबले नाहीत. विकलेल्या फ्लॅटवर त्याने चार बँका आणि एका फायनान्स कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कर्जही घेतले आहे. देवेंद्र संपूर्ण टोळी चालवायचा. या टोळीने इतर लोकांच्या नावे अनेक वेळा फ्लॅटची नोंदणी करून विविध बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. आरोपीने 10 पेक्षा जास्त फायनान्स कंपन्यांचीही फसवणूक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close