…..अखेर तो सिंहाच्या तावडीत सापडलाच
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
सोशल मीडियावर जंगली प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी दोन वाघाची झुंज , कधी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या दोन प्राण्यांचे मित्रत्वाचे व्यवहार पहिल्या जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत सिंहाच्या तावडीतून वाचण्यासाठी क्लुप्तीचा वापर केला. पण सिंह तो सिंहच त्याने त्याला ‘जंगलाच राजा ‘ का म्हणतात हे दाखवून दिले आहे.
जंगलातील किंवा प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे काही व्हिडीओ आहेत. ज्यात शिकार होणाऱ्या प्राण्यांनी शिकार करणाऱ्या प्राण्यांना चकवा दिला आहे. असाच चकवा देण्याचा प्रयत्न एका प्राण्याने केला पण त्याचा हा प्रयत्न फसला. मृत्यूपासून दूर पळणाऱ्या या प्राण्याला मृत्यूनं गाठलंच.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी सिंह दिसतो आहे. सिंहा काहीतरी शोधतो आहे. त्याची नजर सर्व दिशेने भिरभिर फिरते आहे. तिथं तुम्ही नीट पाहाल तर सिंहाच्या अगदी जवळ दोन शिंगं दिसत आहेत. एक प्राणी इथं लपून बसला आहे. सिंहाला पाहून तो आपली शिकार करेल या भीतीने हा प्राणी तिथं बसला.
सिंहाच्या नजरेआड होता मग जीव गेला कसा?
सिंह हा जंगलाचा राजा. त्याला फसवणं तितकं सोपं नाही. सिंहाच्या नजरेपासून हा प्राणी फार काळ लपू शकला नाही. व्हिडीओमध्ये पुढच्याच क्षणात तुम्हाला दिसेल की, जवळच थोडी हालचाल जाणवते आणि सिंहाचं लक्ष त्या प्राण्यावर जातं. तो लगेच त्या प्राण्याकडे धाव घेतो. सिंह आपल्याकडे येत आहे. हे पाहिल्यावर त्या प्राण्याने जीव वाचवण्यासाठी ती जागा सोडली आणि तो पळू लागला. पण काही परिणाम झाला नाही. अखेर तो प्राणी सिंहाच्या तावडीत सापडला.
आता एकदं का कुणी सिंहाच्या तावडीत सापडलं तर त्याची सुटका अशक्यच, मृत्यू अटळ. या व्हिडीओत पाहू शकता सिंहाने कशापद्धतीने त्या प्राण्याला जबड्यात धरलं आणि त्याच्या मानेवरच हल्ला केला आहे. प्राण्याला त्याच्या तावडीतून सुटतानाही येणार नाही. साहजिकच या प्राण्याचा मृत्यू झाला असावा.
@wildtrails.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिय दिल्या आहेत. कुणी दोघंही लपाछपीचा खेळ खेळत आहेत, असं मजेत म्हटलं आहे. तर सिंहाच्या शिकारीचा असा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजात धस्सं झालं आहे.