मानवसेवा हीच ईश्वर सेवा.,,,,डॉ प्रमोद पोतदार.
वरुड: / प्रतिनिधी
आत्मविश्वास, इच्छाशक्ती व प्रयत्नांची पराकाष्टा केली की कुणीही यशस्वी होतो. मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे गृहीत धरून आपलं काम करत राहावं असे विचार वैधकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांनी व्यक्त केले. दोन्ही पायांनी अपंगत्व असूनही व सेवाभाव प्रवृत्तीमुळे ते सर्वांच्या गळ्यातील ताईत ठरले आहे. सद्यस्थितीत डॉक्टरी पेशा व्यवसायिक होत असताना डॉ पोतदार रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहे.
**अपंगत्व असूनही जिव्हाळा.
आगळ्यावेगळ्या परिस्थितीतुन जात असताना आपल्या अपंगत्वावर मात करत डॉ पोतदार यांनी एम बी बी एस एम डी पदवी मिळवली. आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्काराचे ते मानकरी ठरले. वैद्यकीय सेवेतील अनेकांनी हॉस्पिटल टाकण्याचा सल्ला दिला. परंतु हा सल्ला त्यांच्या पचनी पडला नाही. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सेवा देण्यात धन्यता मानली. त्यांच्या सेवावृत्ती स्वभावामुळे ते अनेकांचे चाहते ठरले. आताही त्यांची धावपड सुरूच असते.
*रक्तदान शिबिराची धावपळ.
तालुक्यात रक्तदान शिबिराची चळवळ त्यांनी सुरू केली. तालुकाच नव्हे तर जिल्ह्याबाहेर रक्तदान शिबीराचे आयोजन ते करतात. गरजूंना मोफत रक्त देण्यासाठी त्यांची धावपळ सुरूच असते. यामुळे अनेकांचे जीव वाचले. आतापर्यंत तीनशेहून अधिक रक्तदान शिबीर घेऊन मोफत रक्त दिले. याचाच परिपाक म्हणून रक्तपेढी सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. असा डॉक्टर होणे नसल्याच्या प्रतिक्रिया अनेकांच्या आहे.