आमदार यावलकर यांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला
वरुड / गौरव भेलकर
मोर्शी मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार उमेश यावलकर यांनी हिवाळी अधिवेशनात मोर्शी व वरुड भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडून मोर्शी परिसरात संत्रा प्लांट उभारण्याची मागणी केली. यावेळी आमदार उमेश यावलकर म्हणाले की, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री स्तरावर तातडीची बैठक बोलावून संत्रा प्रकल्प सुरू करण्यासाठी कार्यवाही प्रस्तावित केली पाहिजे. तसेच आमदार यावलकर यांनी सांगितले की, मोर्शी तालुक्यातील ठाणथुनी येथे मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत 2018 मध्ये महाराष्ट्र शासन व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड व कोका कोला इंडिया यांच्यात करार झाला आणि संत्रा प्रकल्पाचे उद्घाटनही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. परंतु तरीही तेथे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही, तर सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात दररोज ३०० टन संत्र्याचे गाळप होऊन हजारो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यामुळे हा अपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे काम करण्यात या