हटके

प्ले स्कुल च्या वॉशरूम मध्ये गेली शिक्षिका छताकडे पाहतच अवाक झाली 

Spread the love

नोएडा  / नवप्रहार डेस्क                 

                     महिलांच्या सूरक्षिते बाबत शासना कडून अनेक दावे करण्यात येतात. पण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या लागोपाठ घडणाऱ्या घटने नंतर शासनाच्या दाव्यात किती सत्यता आहे हे बघायला मिळते. बाहेर तर सोडा पण महिला , तरुणी इतकच काय तर अल्पवयीन बालिका घरात देखील सुरक्षित नसल्याच्या घटना वाचण्यात येतात. कामाच्या ठिकाणी देखील महिला वर्ग सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळते.

         ज्या ठिकाणी मुली आणि तरुणींनीना त्यांच्या हक्का बद्दल शिकविले जाते तेथे सुद्धा महिला ,मुली आणि तरुणी सुरक्षित नसल्याचे आढळते. बदलापूर येथे घडलेल्या घटने नंतर तर तान्हुल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत विद्यार्थी तर सोडा शिक्षिका देखील सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. नुकताच मुंबईतील कायद्याचे शिक्षण देणाऱ्या एका कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांकडून महिला शिक्षिकेचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघड झाली होती. आता नोएडा येथील प्ले स्कुल मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शाळेतील शिक्षिकेने सांगितल्यानुसार, 10 डिसेंबर रोजी ती वॉशरूममध्ये गेली तेव्हा तिची नजर तिथं लावलेल्या बल्ब होल्डरवर पडली. तिथं तिला लाइट दिसला. तिला संशय आला म्हणून तिनं गार्डला बोलावलं आणि होल्डरमध्ये काय आहे ते तपासायला सांगितलं. बल्बच्या होल्डरमध्ये जे सापडलं ते पाहून तिला धक्काच बसला.

प्ले स्कूलच्या वॉशरूमच्या बल्ब होल्डरमध्ये स्पाय कॅमेरा होता. याबाबत त्यांनी शाळेचे संचालक नवनीत सहाय आणि समन्वयक पारुल यांच्याकडे तक्रार केली. मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. शिक्षकाचा आरोप आहे की, याआधीही वॉशरूममध्ये कॅमेरा सापडला होता. या प्रकरणी अद्याप कोणतेही रेकॉर्डिंग सापडलेले नाही. त्यावेळी समन्वयकाकडेही तक्रार केली होती, मात्र कारवाई झाली नाही. आता पुन्हा कॅमेरा मिळाल्यानंतर तिने पुरावे घेऊन पोलीस ठाणं गाठलं.

शिक्षिकेने फेज 3 पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, सुरक्षारक्षकाने सांगितलं की, संचालक नवनीत सहाय यांनीच हा कॅमेरा लावला होता. त्यानंतर शाळेच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी संचालक नवनीश सहाय याला मंगळवारी सायंकाळी अटक केली. संचालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी गार्डवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. तसंच कॅमेरा ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.

छुपा कॅमेरा कसा शोधायचा?

रूम, चेजिंग रूम, टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम अशा ठिकाणी छुपे कॅमेरे नाहीत ना, हे तपासण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटं खर्च करावे लागतील. त्यानंतर सोप्या ट्रिक्स च्या मदतीने तुम्ही याबाबत शहानिशा करू शकता.
लाईट बंद करुन पहा
रूममध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम रुममधील सर्व दिवे (Lights) बंद करा आणि रुममध्ये सर्वत्र अंधार आहे ना याची खात्री करा. सामान्य नजरेने रूममधील कॅमेरा आपण पाहू शकत नाही. परंतु, कॅमेरात पाहिल्यानंतर त्याच्या काचेवर पडणाऱ्या प्रकाशामुळे आपल्याला कॅमेरा असल्याची खात्री पटू शकते. त्यानंतर ज्या ठिकाणी संशय येतो त्या सर्व ठिकाणांची पाहाणी करावी. यामुळे कॅमेराला तुम्ही कैद करु शकाल.
तपासणी आवश्यक
हॉटेलच्या रूम मध्ये छुपा कॅमेरा नाही ना, हे तपासण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वस्तूंमध्ये कॅमेरा लपवला जाण्याची शक्यता आहे, अशा सर्व वस्तुंची बारकाईने तपासणी करा. रूममधील ज्या सामानावर तुम्हाला संशय आहे, असे सामान बाजूला ठेवा किंवा झाकून ठेवा. नंतर तुम्ही हॉटेलमधील कर्मचाऱ्याला बोलावून असे संशयित सामान रूमबाहेर घेऊन जायला सांगू शकता. हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करताच सेटटॉप बॉक्स, करनेट पाईप, नाईट लॅम्प, स्कायलाइट, गेट हॅण्डल, फ्लॉवरपॉट, टेबल वरील वस्तू, घड्याळ, स्मोक डिटेक्टर, एसीचे पॉवर अॅडप्टर, अलार्म सेंन्सर, टेलिफोन या वस्तू बारकाईने तपासून घ्या. त्याचबरोबर बाथरुममधील काचा, टुथब्रश बोल्डर, खिडक्या, टॉवेल बार, नळ आदी गोष्टींची बारकाईने तपासणी करा.
फ्लॅश लाईटचा (Flash Light) वापर करा
जर तुम्ही रूममधील कोणत्याही काचेवर फ्लॅश लाईट मारला तर त्याचे रिफ्लेक्शन पडतात. यामुळे देखील कॅमेरा विषयी माहिती मिळू शकते. यासाठी रूममधील सर्व लाईटस बंद करुन तुम्ही फ्लॅश लाईटची मदत घेऊ शकता. तसेच अनेक रूम्समध्ये एक ब्लिंक होणारा किंवा सतत चमकत राहणारा दिवा असतो. लाईट बंद करुन हा चमकणारा दिवा कशाचा आहे, याचा शोध तुम्ही घेऊ शकता किंवा ब्लिंक होणाऱ्या दिव्याच्या ठिकाणी तपास करु शकता.
ब्लूटुथ (Bluetooth) किंवा वायफायची (Wi-Fi) घ्या मदत
सध्याच्या वापरात असलेल्या बहुतांश कॅमेरांमध्ये ब्लूटुथ किंवा वायफायचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही ब्लूटुथ किंवा वायफाय सुरु करुन देखील छुप्या कॅमेराबाबत माहिती मिळवू शकता. अशावेळी काही गडबड वाटल्यास सावध व्हा. तसेच या व्यतिरिक्त कोणालाही फोन लावून आवाज चेक करा. कारण काही वेळा एखादे आणखी डिव्हाईस त्या भागात असेल तर एक वेगळा आवाज ऐकायला मिळतो. यातून छुप्या कॅमेराचा शोध लागू शकतो.
अॅप्लिकेशनची (Application) मदत घेऊ शकता
सध्या यासाठी अनेक अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. यामुळे तुमच्या आसपास असलेल्या अन्य डिव्हाईसची माहिती तुम्हाला मिळू शकते. इंटरनेटवरुन तुम्ही छुपा कॅमेरा शोधणारी अॅप्लिकेशन डाऊनलोड करु शकता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close