सामाजिक

धामणगावात प्रथमच भव्य विदर्भ स्तरीय कराओके गीत स्पर्धा

Spread the love

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

भव्य विदर्भ स्तरीय कराओके गीत स्पर्धा चे आयोजन वायकेएसएस ग्रुप म्युझीकल स्टुडीओ धामणगाव तर्फे आयोजीत करण्यात आलेला आहे. पहिली ऑडीशन फेरी २२ डिसेंबर २०२४ ला सकाळी ९ वा. सुरु होईल व ग्रैंड फिनाले फायनल प्रोग्राम ५ जानेवारी २०२५ ला सकाळी १ पासून सुरु होईल. त्यासाठी त्याच दिवशी शेवटी बक्षिस वितरण सुध्दा करण्यात येईल. स्पर्धकाला मराठी किंवा हिंदी फिल्मीगीत, भावगीत, भक्तीगीत, क्लासीकल गीत गाता येईल. स्पर्धेच्या दोन फेल्या होतील. पहिल्या दोन ऑडीशन मधे पात्र होतील. तेच स्पर्धक दुसन्या अंतीम फेरीत बँड फिनालेसाठी पात्र राहतील. स्पर्धकांनी आपला सहभाग २० डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदवावा.
स्पर्धेमध्ये तीन गृप राहतील पहिला अ गृप वयोमर्यादा ७ ते १५ वर्षे वयोगट, दुसरा व गृप वयोमर्यादा १६ ते ४० वर्षे वयोगट, तीसरा क गृप वयोमर्यादा ४१ वर्षा वरील. यात प्रथम पुरस्कार ५१००/- व स्मृतीचिन्ह, द्वितीय पुरस्कार ३१००/- व स्मृतीचिन्ह, तृतीय पुरस्कार २१००/- व स्मृतीचिन्ह, चतुर्थ पुरस्कार ११००/- असे राहिल. कार्यक्रमाचे स्थळ महावीर भवन मेन रोड धामणगाव रेल्वे, नोंदणी करीता व्हाटसअप क्र. ८८५७८०२१९७, ९३५६३८५१३७ उदयन्मुख कलाकारांसाठी प्लॅटफॉर्म वायकेएसएस ग्रुप म्युझीकल स्टुडीओ धामणगाव रेल्वे करण्याचा मानस केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close