क्राइम

कुख्यात गुंड स्थानबध्द नागपुर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

Spread the love

नागपुर प्रतिनिधी अमित वानखडे

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०७.जुलै २०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे हुडकेश्वर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे रोहीत उर्फ विक्रांत वल्द विजय पल्लेवार, वय २९ वर्षे, रा. प्लॉट नं. ८३, जय विघ्नहर्तानगर, बांते ले-आउट, हुडकेश्वर रोड, पो.ठाणे. हुडकेश्वर, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक ०७.जुलै.२०२३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. ०७.जुलै २०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. . रोहीत उर्फ विकांत वल्द विजय पिल्लेवार, याचे विरूध्द पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे खुन करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, खंडणीसाठी एखादया व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत करण्याची भीती घालणे, लैगिंक अत्याचार करणे, अश्लिल भाषेत शिवीगाळ करणे, अपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे, कोणत्याही व्यक्तीला खोटे पुरावे देण्याची धमकी देणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, इत्यादी मालमत्तेविरूध्दचे तसेच शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे त्याचेवर सन २०२१ मध्ये हुडकेश्वर पोलीसांकडून कलम १०७, ११६ (३) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असता त्याने शांतता व नागरीकांशी चांगली वर्तवणुक ठेवण्याबाबत एक वर्ष कालावधी करीता अंतीम बंधपत्र दिले होते, परंतु तरीसुध्दा त्याने गुन्हे करणे सतत सुरू ठेवले. अलीकडील काळात त्याने पोलीस ठाणे हुडकेश्वर हददीत दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, खंडणीसाठी एखादया व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत करण्याची भीती घालणे, लैंगिक अत्याचार करणे, अश्लिल भाषेत शिवीगाळ करणे, अपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे, कोणत्याही व्यक्तीला खोटे पुरावे देण्याची धमकी देणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, इत्यादी अशा प्रकारचे तीन गुन्हे केले आहे.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे रोहीत उर्फ विक्रांत वल्द विजय पिल्लेवार, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे हुडकेश्वर, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close