क्राइम

एक चूक आणि निकिता पोलिसांच्या जाळ्यात 

Spread the love

बेंगळुरू  / नवप्रहार डेस्क 

                     AI अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येचे पडसाद देशात पाहायला मिळत आहे. त्याच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पत्नी निकिता हिच्या हत्येची मागणी नागरिक करत होते. पण निकिता आणि तिचे कुटुंब घटना घडल्यापासून फरार असल्याने पोलिसांना ते गवसत नव्हते. शिवाय ते व्हाट्स अप कॉल द्वारे एकमेकांच्या संपर्कात असल्याने त्यांचे लोकेशन ट्रेस होत नव्हते. पण निकिता ने एक चूक केली आणि ती पोलिसांच्या जाळयात अडकली.

पोलिसांपासून वाचण्यासाठी निकिता रोज घर बदलत होती. लोकेशन लपवण्यासाठी ती व्हॉट्सॲपवर कॉल करत होती आणि अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत होती. पण, तिच्या सर्व युक्त्या अयशस्वी झाल्या आणि एका फोन कॉलने ती पोलिसांच्या सापळ्यात अडकली. या फोन कॉलवरून पोलिसांना ती गुरुग्राममध्ये लपल्याची माहिती मिळाली.

निकिताचा शोध घेत असलेल्या पोलिसांनी तिला तातडीने गुरुग्राम येथून अटक केली. निकिताच्या अटकेसोबतच तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांना प्रयागराज येथून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अतुल सुभाषला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातील चौथा आरोपी निकिताचा काका सुशील सिंघानिया सध्या फरार आहे.

घराल कुलूप लावून पळाले

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल होताच या आरोपींनी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील त्यांच्या घराला कुलूप लावले होते. बंगळुरू पोलीस जौनपूरला पोहोचल्यावर त्यांनी सिंघानियाच्या घरी नोटीस चिकटवली आणि त्यांना तीन दिवसांत हजर राहण्यास सांगितले. या टीमने कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांची यादी बनवून त्यांच्यावर लक्ष ठेवले. मात्र आरोपी व्हॉट्सॲपवरच कॉल करत होते, त्यामुळे त्यांचा माग काढणं कठीण जात होतं. दरम्यान, सिंघानिया कुटुंबीयांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

निकिताची एक चूक

दरम्यान, निकिता गुरुग्राममधील पीजीमध्ये राहू लागली, तर तिची आई आणि भाऊ उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील झुसी शहरात लपले. यावेळी ती व्हॉट्सॲप कॉलद्वारे सर्व नातेवाईकांच्या संपर्कात होती. पण, निकिताने चुकून जवळच्या नातेवाईकाला फोन केला, त्यानंतर पोलिसांनी तिच्या टॉवर लोकेशनचा मागोवा घेतला आणि ते गुरुग्रामच्या रेल विहारमधील पीजीमध्ये पोहोचले. पोलिसांनी तात्काळ निकिताला तिथून ताब्यात घेतलं आणि तिच्या आईला बोलवायला सांगितलं. निशा सिंघानियाला फोन आल्यावर पोलिसांनी तिचा झुशी शहरापर्यंत माग काढला आणि तिला ताब्यात घेतले.

दरम्यान, अतुल यांच्या चार वर्षांच्या मुलाचे काय होणार, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला होता. पोलिसांनी मुलाला कुटुंबातील नातेवाईकाकडे सुपूर्द केले. पोलिसांनी आरोपींना बंगळुरूला नेत असताना त्यांचे जबाब नोंदवले.

पोलीस सूत्रांनी सांगितले की निकिता आणि तिच्या कुटुंबाला बंगळुरूला घेऊन जाताना एक मोठे आव्हान होतं, कारण फ्लाइटमधील इतर प्रवाशांनी त्याला ओळखू नये आणि कोणताही गोंधळ होऊ नये. अशा स्थितीत तिघांनाही रात्री उशिरा विमानाने बंगळुरूला नेण्यात आले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, बंगळुरूला पोहोचण्यापूर्वी त्यांच्या अटकेची बातमी बाहेर येऊ नये यासाठी ते अधिक सावध होते. कारण, अतुल सुभाष यांच्या मृत्यूच्या संतापामुळे निकिता आणि कुटुंबीय बंगळुरूला रवाना झाल्याची बातमी आल्याने विमानतळावर धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.

बंगळुरूला पोहोचल्यानंतर, निकिता, तिची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि नंतर पहाटे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले, तिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गेल्या सोमवारी अतुल सुभाष हे बंगळुरू येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. अतुल यांचा भाऊ विकास कुमारच्या तक्रारीवरून पोलिसांनी निकिता आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना मुलाचा ताबा हवा असल्याचेही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताने चौकशीदरम्यान सांगितले की, तिने कधीही अतुलला त्रास दिला नाही, तर अतुलच तिला त्रास देत होता. तिला पैसे हवे असते तर ती घराबाहेर पडली नसती असेही तिने सांगितले. आपल्या 24 पानी सुसाईड नोट आणि 80 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये अतुल सुभाष यांनी निकिता आणि तिच्या कुटुंबीयांवर क्रुरता आणि हुंड्यासाठी छळाचे खोटे गुन्हे दाखल करून पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. निकिताने केस मागे घेण्यासाठी 3 कोटी रुपयांची मोठी रक्कम मागितली होती, असा आरोप अतुलने केला होता.

निकिताला ४० हजार भाडे असलेल्या पीजीमध्ये राहायचे होते

८ डिसेंबर रोजी निकिता ही हाँगकाँग मार्केटजवळील लक्झरी पीजीमध्ये आली होती. पीजी केअरटेकर सूरज यांनी सांगितले की, निकिताला राहण्यासाठी एका खोलीची गरज होती. निकिता ज्या पीजीमध्ये राहू इच्छित होती, त्याचे भाडे सुमारे ४० हजार रुपये होते. एक महिन्याच्या भाड्यासह एका महिन्याची अॅडव्हान्स रक्कम देखील भरण्यास ती तयार होती. निकिताने काही रक्कम ऑनलाइन जमा केली होती. पोलिस पडताळणीसाठी तिने तिची कागदपत्रे देखील सादर केली होती. ९ डिसेंबर रोजी सूरजने निकिताची कागदपत्रे पडताळणीसाठी पोलिसांकडे पाठवली होती.

पोलिस व्हेरीपिकेशन

निकिता सिंघानिया हिचा पोलिस व्हेरिफिकेशनचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी बेंगळुरू पोलिसांना ती नव्या पीजीमध्ये शिफ्ट होत असल्याची माहिती दिली. पीजीसाठी ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी तिच्या नव्या पीजीभोवती सापळा रचला. निकिता ही हाँगकाँग मार्केटजवळ येताच पोलिसांनी तिला अटक केली. पीजीकेअरटेकर सूरज यांनी सांगितले की, निकिताला तिच्या नव्या पीजीतून अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी तिला बाहेरच अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close