क्राइम

अट्टल गुन्हेगार विनायक गावंडे सह पत्नी रेखा व मुलगा अभिषेक फरार

Spread the love

 

44 हजार रुपयाचे सोयाबीन चोरले, गुन्हे दाखल

अकोला प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा कारभार हा नेहमीप्रमाणे संशयास्पद असल्याचा ठपका यावेळी सुद्धा उरळ पोलीस स्टेशन यांनी भरून काढला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व नेते मंडळी महिलांच्या संरक्षणाबाबत मोठमोठ्या घोषणा करतात त्याशिवाय या देशाचे महाराष्ट्राचे राजकारण होत नाही परंतु प्रत्यक्षात मात्र महिलांची सुरक्षा संपूर्ण वाऱ्यावर सोडलेली आहे त्याचेच एक उदाहरण उरळ
पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अडोशी गावातील आहे येथील शेत शिवारात दोन एकर शेती अकोल्याच्या रहिवासी असलेल्या चौधरी नामक महिलेने कोर्टामार्फत खरेदी केली असून शेताची वहिवाट तुझा स्वतः सुरू केली यावर्षी शेतामध्ये तूर सोयाबीन पिकाची पेरणी केली परंतु पेरणी केल्यापासूनच अडोशी गावातील अट्टल गुन्हेगार विनायक श्रीराम गावंडे हा सवयीप्रमाणे चौधरी ह्या निराधार महिला असून अकोला शहरात वास्तव्य करीत असल्यामुळे शेताच्या पिकावर वाईट नजर ठेवून होता चोरीच्या उद्देशाने सतत चौधरी यांच्या शेतातील चोरी करीत होता कधी झाडे कापून नेत होता तर कधी इतर किरकोळ वस्तू परंतु यावेळी उभे सोयाबीन पीक विनायक गावंडे याने चोरून नेले हा संशय चौधरी यांना पेरणीच्या वेळेपासूनच होता तशा प्रकारची चौधरी यांनी उरळ पोलीस स्टेशनला तक्रारी सुद्धा केल्या आहेत परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोले यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे विनायक गावंडे याची खूप मोठी हिम्मत वाढून यावेळी शेतातील सोयाबीनचे संपूर्ण पिकच चोरून नेले त्यामध्ये पत्नी रेखा विनायक गावंडे व मुलगा अभिषेक विनायक गावंडे यांनी सुद्धा सोयाबीन चोरून नेण्यास विनायक गावंडे याला मदत केली त्यामध्ये बारा क्विंटल 44 हजार रुपयाचे सोयाबीन चोरून नेल्याची तक्रार उरळ पोलीस स्टेशनला शेत मालक चौधरी यांनी केली त्यानुसार आरोपी विनायक श्रीराम गावंडे त्याची पत्नी रेखा विनायक गावंडे व मुलगा अभिषेक विनायक गावंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 303 (2) व ३(५) गुन्हा दाखल केला आहे तेव्हापासून तीनही आरोपी फरार आहेत गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटून गेले तरी अजूनही उरळ पोलीस या अट्टल गुन्हेगारांना अटक करू शकले नाहीत त्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन घेण्याची मुभा उरळ पोलिसांनी दिली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अकोला पोलिसांच्या अशा या भोंगळ कार्यपद्धतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलीस यांच्यावर संशय निर्माण झाला आहे एका निराधार महिलेचे उत्पन्नाचे साधन असलेले एकमेव दोन एकर शेतातील पीक सुद्धा चोरून नेण्याइतपत चोरांची मजल गेली आहे अशा अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकून तात्काळ जेरबंद करणे गरजेचे आहे परंतु उरळ पोलीस अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अयशस्वी ठरले असून उरळ पोलीस या कुख्यात आरोपींना तात्काळ अटक करतात की अटक पूर्व जामीन घेण्याची मुभा देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close