ती नदीत पडली अर्धातास बेशुद्ध राहिली ; या दरम्यान तिला आलेले अनुभव वेगळेच होते

….मृत्यू अटळ आहे असे म्हटल्या जाते. मृत्यू नंतर शरीरातील आत्मा कुठे तरी निघून जातो आणि धरतीवर फक्त शरीराचं राहते असे म्हटल्या जाते. आत्मा हा अमर आहे असेही म्हटल्या जाते. मेल्या नंतर कोणाला स्वर्ग तर कोणाला नरक मिळतो अशी ही चर्चा आहे. पण खरंच.मरणानंतर आत्मा शरीर सोडून कुठेतरी निघून जातो का ? यावर अनेक तर्कवितर्क लावले जातात.
परंतु पृथ्वीवर काही लोक असे आहेत जे त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्यांनी स्वर्ग पाहिला असा दावा करतात. म्हणजेच ते मृत्यूला चकमा देऊन आले असा त्याचा अर्थ होतो. काही लोक तसा दावा करतात. यात भारतीय आणि विदेशी लोकांचा देखील समावेश आहे.
मृत्यूनंतरचे गूढ जग मानवाच्या मनाला, बुद्धीला सातत्याने आव्हान देत आहे. अमेरिकेतील लिसा ब्लिस यांचा असाच एक अनुभव आहे. त्या न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या आहेत.
काय सांगितला अनुभव
लिसा ब्लिस, या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या जेव्हा 10 वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांच्यासोबत एक भयंकर घटना घडली. त्या एका बर्फाच्छादित नदीत बुडल्या. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या. त्या जवळपास 30 मिनिटं बेशुद्ध होत्या. त्यावेळी त्यांचा आत्मा शरीराला पाहत होता. त्यांचे शरीर नदीच्या पात्रात कलंडलेले होते. तर त्यांचा आत्मा एका सुंदर फुलांच्या रस्त्यावरून चालत होता. ती फुलं अत्यंत आकर्षक आणि गडद रंगाची होती. ती मनाला तजेला आणि अपार शांती देत होती. ती चालत होती. त्यावेळी तिला एक भव्य असं दार दिसलं. त्याविषयी तिने कुठंतरी वाचलेले होतं. बहुधा चर्चेमध्ये तिने ते ऐकलं असावं, असं तिला आठवतं.
दरवाज्याजवळ एक अनोळखी व्यक्ती
तिला त्या दरवाज्याजवळ एक अनोळखी व्यक्ती दिसली. पण तिने जवळ जात पाहिले असता तो तर देव होता. त्याचा चेहरा तिला नीट आठवत नाही. पण त्याच्यामुळे तिला शांत आणि सुरक्षित वाटू लागले. ती दरवाजा हात लावणार तोच तिला कोणी तरी झटक्यात मागे खेचल्याचे तिला जाणवले. तो फुलांचा सुंदर रस्ता अवघ्या क्षणात डोळ्यादेखत झर्रकन गायब झाला आणि ती तिच्या शरीरात परत आली. तिला आता अस्वस्थ वाटू लागले.
Lissa Bliss
चुलत बहिणीमुळे तिला जाग
लिसा या नदीच्या काठावर होत्या. तिची बहिणी तिच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. थंड पाण्यात राहिल्याने तिच्या मज्जासंस्था अथवा इतर अवयवांना कुठलाही अपाय झाला नाही. ती जागी झाल्यावर तिला शरीर जड जड वाटू लागले. तिला जी अपार शांतता मिळाली होती, ती कुठंतरी दूर गेल्याची रूखरूख तिला सतत जाणवते. तिने ही घटना घरच्यांना सांगितली. सर्वांनी तिची काळजी घेतली.
या अनुभवानंतर ती मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करू लागली. तिने हेच तिचे करिअरचे क्षेत्र निवडले. तिने तो अनुभव पुन्हा ताजा करण्याचा पण प्रयत्न केला. याविषयी संशोधन पण करण्यात आले. ज्या लोकांसोबत असे काही घडलेले आहे, त्यांच्याशी संपर्क करून ती त्यांची मनोवैज्ञानिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.