संविधान प्रतिकृतीची विटंबना दोषीं वर देशद्रोह्याचे गुन्हे दाखल करा : भीम टायगर सेनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी
पुसद/ प्रतिनिधी
परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनेच्या घटनेचा निषेध नोंदवित संविधानाची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही आरोपीसह याचा मास्टरमाइंड असलेल्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे बाबत किशोरदादा कांबळे जिल्हाध्यक्ष भीम टायगर सेना यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
देशाची आण, बाण आणि शान म्हणजे संविधान होय. संपूर्ण देश हा संविधानाने पाडून दिलेल्या नियम अटी व कायद्यानुसार चालतो. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल आदर वाटावा, आदर्श घ्यावा यासाठी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्याची घटना परभणी येथे घडविण्यात आली. ही घटना घडविणाऱ्या आरोपी सोबतच अशी घटना घडविण्यास प्रोत्साहन देणाऱ्या सहकार्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.
देश चालविणाऱ्या संविधानाची विटंबना म्हणजे देशाचा अभिमानावर घाला आहे त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदविणे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. परंतु परभणी येथील घटनेत असा निषेध नोंदविणाऱ्यांवर पोलिसांनी विनाकारण लाठी चार्ज करून एक प्रकारे या व अशा घटना घडविणाऱ्यांवर समर्थन दर्शविले आहे. त्यामुळे आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व संविधानाचा आदर करणाऱ्या बद्दलची पोलिसांची लाठी चार्ज व गुन्हे दाखल करण्याचे हुकूमशाही धोरण मागे घेण्यात यावे अन्यथा भिम टायगर सेनेच्या माध्यमातून या देशद्रोही आरोपींना धडा शिकविण्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देणारे निवेदन भिम टायगर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत आज देण्यात आले या निवेदनावर भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे, आदिवासी समाज भूषण पुरस्कार प्राप्त मारोती भस्मे, भीम टायगर सेनेचे प्रभाकर खंदारे, एसएम भगत, लपु कांबळे, आशिष राठोड, विष्णू सरकटे, विक्रांत खंदारे, मिलिंद जाधव, आकाश सावळे, पंडित पवार, गजानन कांबळे, रविकांत सिंगनकर, राजकुमार पठाडे, विलास खंदारे, राहुल धुळधुळे, बबन पाईकराव, राहुल झिंजारे, विनोद जाधव, मारोतराव कांबळे, अर्जुन भगत, भारत कांबळे, विशाल डाके, पंकज देडे, जनार्दन गजभिये,यशवंत कोल्हे, शशांक खंदारे, प्रीतम आळणे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.