राज्य/देश

केलेल्या कृत्याबद्दल मागितली माफी ; तो माथेफिरू बाबासाहेबांच्या फोटो समोर नतमस्तक

Spread the love

परभणी / नवप्रहार डेस्क 

                      शहरात एका माथेफिरू कडून संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना करण्यात आल्याने  शहरासह राज्यात तणावाचे वातावरण सुरू झाले होते. याचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले होते. आता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्या माथेदिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होत आपल्या कृत्यावर पश्चाताप व्यक्त केला आहे.

संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतीची विटंबना करण्यात आल्याने परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केल्याने परभणी जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. येथील आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. त्यामुळे, पोलिसांनी (Police) संबंधित आरोपाला ताब्यातही घेतली होते. अखेर भीमसैनिकांनी सुनावल्यानंतर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेपुढे झाला नतमस्तक झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून तुफान व्हायरल होत आहे.

परभणीतील संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना करणाऱ्या आरोपाला आंदोलकांनी चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर, त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अखेर जिल्हा रुग्णालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन घडल्या प्रकाराबाबत आरोपीने माफी मागितीली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची 10 डिसेंबर रोजी एका माथेफिरूने विटंबना केली होती. त्यानंतर त्या माथेफिरूला आंबेडकर अनुयायांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. सध्या तो आरोपी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. उपचारादरम्यान परभणी शहरातील काही आंबेडकर अनुयायांनी दवाखान्यात जाऊन त्याच्याशी बातचीत केली. त्यानंतर तो माथेफिरू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भीमसैनिकांकडून आरोपीला समजावून सांगण्यात येत असल्याचे दिसते. त्यानंतर, दोन्ही हात जोडून रुग्णालयातच तो डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होताना दिसून येतो.

दरम्यान, परभणीतील आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील तीन पोलीस ठाण्यांतर्गत 300 ते 350 जणांवर विविध कलमान्वयने एकुण 8 गुन्हे दाखल केले आहेत. ज्यात 50 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 41 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. शिवाय या घटनांचे व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेज चेक करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक शहाजी उमप यांनी सांगितलं. मात्र, या हिंसाचारात सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे, ज्यांचीही काहीही चूक नाही, त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसल्याने अनेकांनी अश्रू ढाळले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close