क्राइम

गॅस कटरने एटीएम कापून  16 लाख 50 हजार  पळविले

Spread the love
अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
मोर्शी / वरुड – प्रतिनिधी
                  एसबीआय बँकेचे एटीएम फोडून 16 लाख 45 हजार 500 रु लांबविल्याचा खळबळजनक प्रकार जरुड शहरात घडला आहे. वरुड पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            तक्रारकर्ते  पवन अरुणपंत भोकरे वय 31 वर्ष  रा. शिरखेड ता. मोर्शी हा इ.पी.एस. कंपनीमध्ये चॅनल मैनेजर म्हणून  पवई हीरानंदानी गार्डन, मुंबई येथे  कामावर आहे. भाकरे काम।करीत असलेली कंपनी एटीएम देखभालीचे काम पाहते. भाकरे यांच्याकडे या परिसरातील एटीएम देखभालीचे काम आहे. . ए.टि.एम.मध्ये इ.सव्हीलियन्स सिस्टम आहे ए.टि.एम. मध्ये काही गैरप्रकार झाल्यास आम्हाला फोनव्दारे माहीती देते.
कंपनीने सी.एम.एस. कंपनीला ए.टि.एम. मध्ये कॅश टाकण्याचे काम दिलेले आहे. वरुड मार्शी, शे. घाट, जरूड येथील ए.टि.एम. माध्ये लोडींग करीता सी.एम.एस. कंपनीने अविनाश दुगाणे रा.वरुड, धिरज कराडे व सारंग पंडागळे यांची नेमणुक केलेली आहे. ले कैश लोडींगचे काम पाहतात. ए.टि.एम.मध्ये कश टाकली असता त्याबाबत भोकरे यांच्या मोबाईलवर मेसेज ऑनलाईन सिस्टमव्दारे येतो  दि. 10/05/2023 रोजी जरूड येथील एस बी आय बँकेचे ए.टि.एम.मध्ये दुपारी 02.49 वा. 17,00000 रुपये कैश टाकलेबाबत भोकरे यांना मॅसेज आला होता.
                दि. 12/05/2023 102.58 वा. तक्रारकर्ते  घरी झोपलेलो असता त्यांना त्यांचे  कंपनीचे मुंबई येथील कार्यालयातुन  मोबाईल पर फोन आला व त्यांनी भोकरे यांना सांगितले कि, cfha000502006 या एटीएम ला कटरने कापणे सुरू आहे. अशी माहीती मिळाल्यानंतर भोकरे यांनी  एस. बी. आय. बँक जरुड येथील चपरासी किशोर बेलसरे यांचे मोबाईलवर कॉल करून ए.टि.एम. गॅस कटरने कापण्याचा प्रत्यन्न सुरू असल्याबाबत माहीती दिली असता त्यांनी ए.टि.एम. असलेल्या रुमचे मालक विलास देवराळे यांचे मोबाईल पर सदर घटनेबाबत माहीती देवून ए.टि.एम. पाहणे बाबत सांगितले असता त्यांनी कळविले कि ए.टि.एम. फुटलेले आहे. भोकरे यांनी  स्वता येवुन पाहीले असता ए.टि.एम. चे स्टेस्टमेन्ट चेक केले असता 16.45, 5000 रु नगदी (500 रु च्या 3029 नोटा 100 च्या 1310 नोटा ) ए.टि.एम. चे सी सी टिव्ही फुटेज सुधा पाहीले असता दोन इसम तोंडाला मास गुंडाळुन दिसले तसेच ए.टि.एम बाहेर TO423HP2520 क्रमांकाची लाल रंगाची मारुती स्वीप गाडी दिसत आहे त्याच गाडीने ते चोरलेले घेवुन जातानी दिसत आहे. दि. 12/05/2023 रोजी 02.58 वा दरम्यान जरुड येथील एस.बी.आय.ए.टि.एम. मशीन कटरने फोडुन त्यातील 16,45, 500 स नगदी (500 रु च्या 3029 नोटा 100 च्या 1310 नोटा ) अज्ञात चोरट्यानी चौरली चोरलेली रक्कम लाल रंगाची मारुती स्वीप कारमध्ये टाकून पळून गेले कार्यवाही होणेस रिपोर्ट देत आहे. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close