विदेश

आता हेच पाहायचं राहिलं होत ! मुली भाड्याने ठेवतात बॉयफ्रेंड

Spread the love

                    मुलीचे एक निश्चित वय झाले की मग पालक तिच्या लग्नासाठी स्थळ पाहणं सुरू करतात . काही पालकच असे असतात की जे मुलींची मर्जी सांभाळून असतात. नाही तर अनेक पालक मुली साठी स्थळ शोधतांना तिने जर म्हटले की मला आणखी शिकायचे आहे, तर ते तिला सांगतात की आम्ही तुझे लग्न करून जबाबदारीतून मोकळे होतो. तुला पुढे शिकायचे असल्यास तू सासरी जाऊन शिक

जर मुलींचे लग्न योग्यवेळी झाले नाही तर त्यांच्या व्यक्तीमत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. परंतु, भारतात अशाप्रकारची परिस्थिती क्वचितच पाहायला मिळते.

इथे निश्चित वेळेतच काही मुली लग्नबंधनात अडकतात. एवढच नाही तर, काही मुली बिंधास्तपणे आपल्या पार्टनरबाबत कुटुंबियांना सांगत असतात. परंतु, व्हिएतनामच्या मुली याला अपवाद आहेत. त्या मुली त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करतात. अशातच त्यांच्यावर जर कौंटुबिक दबाव आला तर, त्या या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्या मुली आगळावेगळा निर्णय घेतात. या निर्णयामुळे त्यांच्या आई-वडिलांचं मन तुटतं, पण भारतात असं काही घडलं तर त्यांच्या व्यक्तीमत्वाबाबत चुकीच्या पद्धतीने बोललं जातं.

चायना मॉर्निंग पोस्टने नुकतीच एक बातमी प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल, अशी माहिती देण्यात आलीय. आपल्या कुटुंबाला खूश करण्यासाठी किंवा कुटुंबात आपलं रेप्युटेशन खराब होऊ नये, यासाठी व्हिएतनामच्या मुली भाड्याने त्यांच्यासोबत बॉयफ्रेंड ठेवतात. एकटेपणाचा कलंक आपल्या माथ्यावर लागू नये, यासाठी येथील तरुणी अशाप्रकारचा भन्नाट निर्णय घेतात. व्हिएतनाममध्ये अशाप्रकारच्या ट्रेंडची खूप चर्चा होत आहे.

येथील तरुणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा तरुणांशी कनेक्ट होतात, जे त्या मुलींचे पार्टनर म्हणून राहण्यास तयारी दर्शवतात. परंतु, दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा रोमॅन्टिक क्षण साजरा केला जात नाही. कोटुंबिक दबावातून बाहेर पडण्यासाठी अशाप्रकारचा निर्णय तरुणींना दिलासा देऊ शकतो. पण या तरुणींना मानसिकरित्या अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो.

कायद्याच्या चौकटीत बसत नाही

एका पार्टनरला भाड्याने घेणं कायद्याच्या चौकटीत बसत नाही. कारण अशाप्रकारचे संबंध कायद्यानुसार सुरक्षित नाहीत. अशा कृत्यामुळे तुम्ही एखाद्या अडचणीत सापडलात, तर तुम्ही स्वत: अशा परिस्थितीला जबाबदार राहू शकता. कायद्याचा विचार न करता अशाप्रकारे केलेले करार तुमच्यावर मोठं संकट उभं करू शकतात. जरी तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल, तर तुमच्या मान सन्मानालाही ठेच पोहचू शकते.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close