शैक्षणिक

तळा ज्युनियर कॉलेजचे प्रा. वाले आर .बी .यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

Spread the love

 

भंडारा(  प्रतिनिधी) तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला – वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा प्राध्यापक वाले आर बी यांचा ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सेवापूर्ती समारंभ पार पडला. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री मारोती शिर्के गुरुजी, अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेश देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे , प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, संस्थेचे सदस्य डॉ सतिश वडके, श्री महादेव बैकर, श्री लिलाधर खातू, चंद्रकांत खातू, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, सर्व विद्याशाखेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक वाले आर बी यांचे आप्तेष्ट व मित्र उपस्थित होते. यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गो म वेदक विद्यामंदिर, पन्हेळी हायस्कूल, प्राथमिक विद्यामंदिर, वाले आर बी यांचेवर प्रेम करणारे नातेवाईक व मित्रमंडळींनी प्राध्यापक वाले आर बी व सौ वाले यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
आज प्राध्यापक वाले आर बी हे शासनाच्या नियत वयोमानाप्रमाणे आपल्या कर्तव्यातून सेवानिवृत्त झाले . हा एक आनंदाचा गहिवर मनाला स्पर्शून जातोयं ! एक सच्चा मार्गदर्शक, एक स्नेही, एक मन:स्वी मित्र, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून आपली प्रचिती किंबहुना आपल्या व्यक्तित्वाचा ठसा आमच्या मनावरती कोरलेला आहे. वाले सर म्हटले की चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य, हास्यांनंच येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत करणं हा त्यांच्या स्वभावाचा उत्तम गुण आहे, तो आम्ही कधीही विसरू शकणार नाही.
आपणास भेटल्यानंतर तो माणूस आनंदी होणार नाही हे क्वचितच घडेल, आपण सातत्याने आम्हाला मार्गदर्शन केलंत आमच्यासाठी प्रेरणास्थान बनलात, आपण नियत वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त होत आहात, आपण संस्थेची नितांत पणाने शैक्षणिक सेवा करत आपलं कार्य, आपली सेवापूर्ती केली. आपल्या सहकार्यांना सहकार्य केलं. मार्गदर्शन केलंत आपले खरोखरच मनापासून आभारी आहोत. पुढील भावी आयुष्य निरोगी व आनंदी होण्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत अशा भावना संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, डॉक्टर नानासाहेब यादव, डॉक्टर भगवान लोखंडे, प्राध्यापक पाटील एन सी, प्राध्यापक सर्जे व्ही बी, प्राध्यापिका सौ कुळकर्णी बी एस यांनी संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे व प्राध्यापक शब्बीर हज्जू यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले तर प्राध्यापक डी टी आंबेगावे यांनी माजी प्राध्यापक श्री तडमोड यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. प्राध्यापक वाले आर बी यांनी सेवापूर्ती समारंभाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पाणावलेल्या डोळ्यांनी संस्था, पदाधिकारी, सहकारी, नातेवाईक व मित्रांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मचे एन टी तर आभार प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी मानले.
याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी , सर्व विद्याशाखेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक वाले आर बी यांचे आप्तेष्ट व मित्रमंडळी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close