Uncategorized

नोकरीच्या तणावातून मुक्त होणार्‍यांना निवृत्ती नंतरही सेवा करण्याची एक संधीच असते- प्रमोद बोर्‍हाडे

Spread the love
रघुनाथ कारमपुरी यांचा डॉ.पाऊलबुधे शैक्षणिक संकुला तर्फे सेवापूर्ती निमित्त गौरव
नगर- निवृत्ती हा जीवनातील एक नवीन टप्पा मानला जातो सेवेतून निवृत्त होऊन आता मनासारखे जगण्याचे असं आपण ठरवतो खरं तर तसे होत नाही. नोकरीच्या तणावातून मुक्त होणार्‍यांना निवृत्तीनंतरही सेवा करण्याची एक संधीच असते. कारमपुरी हे कागदोपत्री सेवापुर्ती   करुन निवृत्त झाले पण प्रत्यक्ष जीवनात माणूस हा कधीच निवृत्त होत नसतो. या सेवापूर्ती नंतरही ते संस्थेच्या विश्‍वस्त पदी चांगले काम करतील. असे प्रतिपादन उद्योजक प्रमोद  बोर्‍हाडे यांनी केले.
वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्‍वस्त रघुनाथ कारमपुरी यांना डॉ. ना.ज. पाऊलबुधे शैक्षणिक संकुलाच्या वतीने सेवापूर्ती निमित्त गौरव करुन सन्मान करण्यात आला यावेळी श्री. कारमपुरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, सचिव रामकिसन देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे, संचालक साई पाऊलबुधे, डॉ.श्रद्धा पाऊलबुधे बाळकृष्ण सिद्धम विजय चितळे शैक्षणिक संकुल प्रमुख डॉ.रेखा राणी खुराणा, डॉ. गोकुळ दास लोखंडे, डॉ. श्याम पंगा, प्राचार्या अनुराधा चव्हाण, प्राचार्य बाळासाहेब बोर्डे, प्राचार्य संदीप कांबळे, प्राचार्या डॉ.सुचित्रा डावरे, प्राचार्य भरत बिडवे मुख्याधापिका अनिता सिद्दम, मीरा नराल, आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
श्री. बोर्‍हाडे म्हणाले निवृत्तीनंतरचे जीवन हा प्रत्येक व्यक्तींसाठी संमिश्र भावनांचा ठरत असतो आनंद आणि दुःख दोन्हीही रूप व्यक्तीसमोर चमकतात. कारमपुरी नावातला र काढला की काम पुरी म्हणजे काम पूर्ण करणार असे हे रघूनाथ व्यक्तिमत्व आहे तुमच्या कार्याची संस्थेच्या कामात दिलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा निरोप समारंभ आयोजित केलेला असतो. असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ.रेखाराणी  खुराणा म्हणाल्या संस्थेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत रघुनाथ कारमपुरी भाऊसाहेबांनी खूप मोलाची साथ दिली प्रत्येक महाविद्यालयाच्या मान्यता पासून ते उभारणीपर्यंत त्यांनी साथ देत सर्वांच्या सहकार्याने काम केले त्यामुळे संस्थेची प्रगती झाली. त्यांच्या या कामाचा कोणाला कधीही विसर पडणार नाही असे मला वाटते.
बाळकृष्ण सिद्धम यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की रघुनाथ हा माझ्यासमोर इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत होता तो आज उंच भरारी घेऊन सेवानिवृत्त होतो. याचा मला अभिमान वाटतो सेवेतून निवृत्त झाला तरी संस्थेमध्ये तो विश्‍वस्त म्हणून कार्य सुरू ठेवून योगदान देत राहील असे ते म्हणाले.                            या वेळी डॉ.श्याम पंगा, प्राचार्य भरत बिडवे यांनी देखील आपल्या भाषणात कारमपुरी यांचा काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.
संस्थेचे सचिव रामकिसन देशमुख म्हणाले की श्री.कारमपुरी हे शाळेतुन सेवा निवृत्त झाले आहे पण विश्‍वस्त म्हणून ते कायमस्वरूपी आमच्या संस्थेत काम पाहतील. सेवापूर्ती झाली पण कामामधून ते कधीच निवृत्त होणार नाहीत असे देशमुख यांनी सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.             सत्काराला उत्तर देताना कारमपुरी म्हणाले 1985 पासून सेवा शिक्षण प्रसारक मंडळात काम करण्याची संधी मला मिळाली. या शैक्षणिक संकुलामधील शाळेचे काम केले त्या कामातून सेवापुर्ती झाली स्व.डॉ.नाथ पाऊलबुधे साहेबांच्या या संस्था उभारणीचा उद्देश एकच होता की गोरगरीबांची विडी कामगारांची मुले शिकली पाहिजे त्यासाठी येथे बालवाडी पासून शाळा सुरू केली नंतर प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी त्यांचे अथक परिश्रम आम्ही पाहिले त्यामुळे आम्ही सर्व संचालक विश्‍वस्त कर्मचारी आपली संस्था म्हणून चांगले काम करीत असुन आज आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ शिक्षकवृंद या सर्वांनी मिळून मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकलो डीएड, बीएड, बी फार्मसी,डी फार्मसी, पॉलीटेक्निक कॉलेज उभे राहिले मी शाळेतुन सेवा निवृत्त झालो असलो तरी माझी सेवा, कार्य सुरूच राहील सेवा शिक्षण प्रसारक मंडळासाठी माझे योगदान सदैव  राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी विजय चितळे,दादासाहेब भोईटे,काही शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमृता रत्नपारखी यांनी केले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close