आनंदवार्ता… एएचपीच्या १ हजार ४९८ घरकुलांना मंजुरी

पीएम आवास योजना सरकली पुढे
गुरुदेव युवा संघाच्या प्रयत्नांना यश
यवतमाळ: आधीच थंडबस्त्यात आणि त्यानंतर निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे रेंगाळली पंतप्रधान आवास योजना पुढे सरकली आहे योजनेतील एएचपी घटकातील लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाल्याने गुरुदेव युवा संघाच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे
पंतप्रधान आवास योजनेतून पक्के घर मिळेल या आशेवर जगणाऱ्या गरिबांच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी चालविलेल्या पाठपुराव्यामुळे नगर परिषदेला तातडीने यातील अर्जदारांची यादी प्रसिद्ध करावी लागली इतक्यानेच नव्हे तर संबंधित कंत्राटदारालाही बांधकामाचा कार्यादेश देण्यात आला आहे अफोर्डेबल हाऊसिंग पार्टीनरशिप (एएचपी) घटकातून १ हजार ४९८ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहे सर्वे नंबर ४९/२ या जागेवर पात्र लाभार्थ्यांना एका इमारतीमध्ये घरकुले दिली जाणार आहे याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी ९ डिसेंबरला गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांना पत्र जारी करून माहिती दिली आहे पंतप्रधान मोदींनी २०१४ सालीचा सर्वांना घरकुले देण्याची महाघोषणा केली होती परंतु आज २०२४ संपण्याच्या मार्गावर आहे तरी देखील या योजनेतून सर्वांना घरे काही मिळाली नाही घराचे स्वप्न पाहून काहीजण अनंतात विलीन झाले काहींचा अंगावर घर कोसळले पण ही योजना काही केल्या पुढे सरकली नाही परंतु,गरिबांचा आधारवड असलेल्या मनोज गेडाम यांच्या अविरत प्रयत्नांमुळे या योजनेने एक पाऊल पुढे टाकले आहे