क्राइम

प्रेमात अडथळा ; मारेकऱ्यांनी कापला दोघांचा गळा

Spread the love

निपाणी / नवप्रहार डेस्क 

                       प्रेमात अडथळा ठरत असलेल्या व्यक्ती सोबत भांडण झाल्याने मारेकऱ्यांनी दोघांच खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. घटना अल्कोळ येथे घडली आहे. घरात दोघांचा खून झाल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता.  स्वयंपाक घर, खोली रक्ताने माखले होते. उंबऱ्याच्या बाहेरही रक्ताचे डाग दिसत होते.

 मंगल सुकांत नाईक (वय ४५) आणि प्रज्ज्वल सुकांत नाईक (१९) अशी मृतांची नावे आहेत. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने हे कृत्य केले असून, याप्रकरणी रवी खानापगोळ व लोकेश नाईक (दोघेही रा. कोणकेरी, ता. हुक्केरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत जिल्हा पोलिस  अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेली माहिती अशी, मंगल यांच्या पतीचे कोरोनाकाळात निधन झाले आहे. अक्कोळ येथे मोलमजुरी करून हे कुटुंब येथे वास्तव्यास आहे. आपल्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने रवी खानापगोळचा मंगल आणि भाऊ प्रज्ज्वल त्यांच्यात अनेकदा वाद झाला होता. बुधवारी (ता. ४) रवी हा आपला सहकारी लोकेश याला घेऊन अक्कोळ येथे त्यांना जाब विचारण्यासाठी आला होता. यावेळी वाद झाला असता मुलगा प्रज्ज्वल भांडण सोडविण्यास गेला.

त्यानंतर मंगल व प्रज्ज्वल यांच्यावर रवी व लोकेश यांनी रॉड व इतर शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेची माहिती कळल्यानंतर निपाणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घरात रक्ताचा सडा व भिंतीवरही रक्ताचे डाग दिसत होते. रात्रीच पोलिसांनी तीन पथके करून तपास सुरू केला. एक पथक कोणकेरी, दुसरे पथक चंदगड व तिसरे पथक अथणी भागाकडे रवाना झाले होते. कोणकेरी येथे रवीच्या शोध घेताना त्याचा मित्र लोकेश याच्या घरी पोलिस पोहोचले. तेथे तो रक्ताचे कपडे जाळण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याच्या चप्पलवर रक्ताचे डाग सापडले. पोलिसांनी मुख्य संशयितांची चौकशी केली. रवी याच्याकडे पोचले तेव्हा तोही पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तेथेही संशयितांनी कपडे जाळल्याचा प्रकार दिसून आला. घरी चौकशी केली असता त्याच्या काही कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले. गावाकडे जाताना मध्यरात्री शस्त्र टाकून पलायन केल्याचे त्यांनी सांगितले आहे. मारेकऱ्यांकडे चाकू आढळला असला तरी रॉडने हल्ला झाला असून तो कुठे टाकला आहे, त्याचा तपास पोलिस करत आहेत.

रात्रीतून दोघेही संशयित कपडे जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मुख्य संशयित रवी हा चंदगड येथील एका कारखान्यात काम करत असल्याचे समजले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले असून, या प्रकरणात तिचा किती सहभाग आहे, यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

घरात रक्ताचा सडा

नाईक यांच्या राहत्या घरीच संशयितांनी दोघांचा खून केल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता. स्वयंपाक घर, खोली रक्ताने माखले होते. उंबऱ्याच्या बाहेरही रक्ताचे डाग दिसत होते. भिंतीवरही रक्ताचा सडा होता. त्यामुळे घरात सर्वत्र रक्त दिसून आले आहे. घराशेजारी असलेल्यांबरोबर त्यांचे सबंध चांगले नसल्याने ही घटना उशिरा उघडकीस आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close