आप्पाची महाराज ग्राम संघ जवळा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली.
# ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे यांच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन.
*चांदुर रेल्वे (ता.प्र.) प्रकाश रंगारी*
चांदुर रेल्वे : येथून जवळ असलेल्या जवळा धोत्रा येथील आप्पाजी महाराज ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 19 /06/ 2024 ला बुधवार रोजी आप्पाजी महाराज मंदिर जवळा येथे पार पडली. या सभेला मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्र राज्य जिवानोन्नती अभियानाचे चांदुर रेल्वे येथील अधिकारी श्री पेठे , मोनिका, सविता थेटे , श्री सतीश शिंदे, महिला फार्मर प्रोडूसर कंपनीचे सीईओ ) या सर्वांनी उपस्थित राहून अगदी मोलाचे मार्गदर्शन केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये आरोग्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या. जसे की रक्त तपासणी, बी.पी., शुगर आणि शिकलसेल इत्यादी तपासण्या करण्यात आल्या
ह्या तपासण्या करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे येथून एक टीम जवळा येथे बोलून, आप्पाजी महाराज ग्राम संग जवळा येथील सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांची तपासणी करण्यात आली. ग्राम संघाच्या 40 ते 50 स्त्रियांनी तपासण्या केल्या. ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे येथून श्री अमित बेलसरे समुपदेशक श्रीमती पूर्वी लाकोडे, वैशाली भोवते, सारिका पवार, पद्मा हुडे, श्री नितीन गिरडकर, श्री शुभम राऊत आणि जवळा येथील डॉ. मनोहर या सर्वांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर पार पडले.
ह्या कार्यक्रमाला जवळा येथील सरपंच श्री आदीमुनि बेंदले, सचिव श्री संजय शिरसाट, उपसरपंच श्री प्रवीण चिंचे, श्री पंकज जगताप पोलीस पाटील जवळा,श्री जुमळे , नवप्रहारचे प्रतिनिधी प्रकाश रंगारी आणि गावकरी मंडळीउपस्थित होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनासाठी आप्पाजी महाराज ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ. शकुंतला प्रकाश रंगारी, सौ. श्रद्धा महेंद्र देशमुख,कोषाध्यक्ष सौ. ज्योती
विजय जगताप, सी.आर.पी. सविता धारणे, कृषी सखी, भारती प्रवीण चिंचे, लिपिका सौ.हर्षा विनोद देशमुख आणि सर्व समूहाचे अध्यक्ष,सचिव, कोषाध्यक्ष आणि सदस्य या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन ही वार्षिक सर्वसाधारण सभा आनंदात पार पाडली.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे संचालन सौ मनीषा बागडे यांनी केले. आणि सौ. भारती चिंचे यांनी केले.