धाब्यावर सीसीटीव्ही लावण्याचे एसपी यांचे आदेश
मोर्शी / ओंकार काळे
मोर्शी शहरात घडणाऱ्या गुन्ह्यावर काही प्रमाणात आकुंश लागावा,चोरट्यांचा तपास जलदगतीने व्हावा, त्यांची ओळख लवकर पटावी यासाठी शहरातील धाबे चालकांनी आपल्या धाब्यावर दोन सीसी टीव्ही कॅमेरे लावावे अशा सूचना मोर्शी पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आल्या.
पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांचे सुचने प्रमाणे मोर्शी पोलीस स्टेशन येथे दि. 02 डिसेंबर 24 ला झालेल्या सभेत मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व हॉटेल व ढाबा संचालक यांनी सीसी टीव्ही लावावे अशा सूचना देण्यात आल्या.
पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत घडणाऱ्या चोरी व इतर घटना यांच्यावर अंकुश लावून त्या घटनेतील आरोपी ओळख पटविण्या करिता सर्व हॉटेल व ढाबा संचालक यांना दोन सीसी टिव्ही पोलीस विभागाकरिता लावावे तसेच रोड वरून जाणारे वाहने सीसी टिव्ही कॅमेऱ्यात दिसेल अशा दिशेने सीसी टिव्ही कॅमेरे
लावावे त्याचबरोबर संशयास्पद इसम आढळ्यास पोलिसांना माहीती द्यावी यासारख्या इतर महत्वाच्या सूचना हॉटेल संचालक यांना मोर्शी चे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिल्या.
सदर सभेला मोर्शी परिसरातील 20 ते 25 हॉटेल संचालक हजर होते.