महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खड्डे मुक्त रस्तेसाठी आदोलन.
रस्त्याच्या मधोमध लावले बेशरमाचे झाड, दोन महिन्यांत रस्ता न झाल्यास तिव्र आदोलन.
नेर:- नवनाथ दरोई
नेर तालुक्यातील उदापूर ते मुकिंदपुर रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असुन विद्यार्थी, शेतकरी, गावातील नागरिक व सामान्य नागरिकांना शहरात विविध कामानिमित्त याचं मार्गाने यावे लागत असल्याने जिवमुठीत घेऊन यावे लागत आहे. तरीही स्थानिक प्रशासन बघ्याची भूमिका घेऊन कुंभकर्ण झोपेतच आहे.
उदापूर ते मुकिंदपुर रस्ता खड्यात की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना व येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला कळत नाही. ग्रामीण भागातील रस्ते गाव खेड्यांना जोडणारे महत्वाचे दळणवळणाचे साधन मानले जाते.जर रस्त्याच खराब असेल तर ग्रामीण भागातील शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगती खुंटते, यामुळेच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास खुंटला जातोय.
याकरिता नेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उदापूर ते मुकिंदपुर रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावुन कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासन व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा जाहीर निषेध करुन जागृत केले. आंदोलन करतेवेळी मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कठाळे,मनवीसे तालुकाध्यक्ष प्रनिल जाधव, तालुका उपाध्यक्ष शिवा माने, सुरज चव्हाण ,अनुप ठाकरे, विश्वजीत इंगोले,अजय आडे, राधेश्याम आसरे,सुरज वानखडे,सतीश वालदे, आकाश जोधडे,प्रविन बावणे व अनेक गावकरी आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.