प्रतिभा फाउंडेशनने जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी घेतले 125 दिव्यांग विद्यार्थ्यांचे मोफत रक्त तपासणी आरोग्य शिबिर.
यवतमाळ / प्रतिनिधी
दिनांक ०३ डिसेंबर २०२४ रोजी समाज कल्याण विभाग जि.प यवतमाळ व नवजीवन सेवा संस्था द्वारा संचालित निवासी मतीमंद विद्यालय भोसा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक दिव्यांग दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.पियुष चव्हाण सर तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मा.महल्ले सर तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.आर.आय शेख सर, मा.सचिव एस.आर शेख सर तसेच प्रतिभा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या संस्थापक मा.इंजि.प्रतिभाताई पवार , डॉ. सुधा खडके ,सचिन शेळके ,संगीता पिपरानी, विजय बुंदेला ,नवनाथ दरोई, जनार्धन राठोड, अलका चिंचोळकर, खोब्रागडे सर, के.जी.एन सिटी न्यूज चे संपादक मो.मतीन सर तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे समाज कल्याण अधिकारी मा.पियुष चव्हाण सर यांच्या हस्ते दिव्यांगांचे जनक हेलेन केलर तसेच ब्रेल लिपी चे जनक लुईस ब्रेल यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्याचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले त्यांनतर समाज कल्याण अधिकारी मा.पियुष चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण क्षेत्रात सामान्य मुला प्रमाणे दिव्यांग मुलांचे हक्क व अधिकार या बाबत मुलांना मार्गदर्शन केले व त्यानंतर प्रतिभा फाउंडेशन सेवाभावी संस्था तर्फे 125 दीव्यांग विद्यार्थ्यानसाठी हिंद लॅब यवतमाळ येथील लॅब तेकनिशियन सचिन शेळके यांना या शिबिराचे श्रेय फौंडेशनने दिले ,लॅब चे मयूर माटे, हितेंद्र पवार,स्वराज खडसे, गंगा वाघमारे, रीया मॅडम या टीम ने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यांचे रिपोर्ट सुधा देणार आहे, यावेळी सगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक मा. शेख अल्तमश शेख रफिक सर व शाळेचे सगळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारे जागतिक दिव्यांग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.