अपघात
कन्नौज (युपी )/ नवप्रहार डेस्क
वेगात असलेली स्कार स्कार्पियो कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर (डिव्हायडर) आदळल्याने आणि पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पलटली. दरम्यान मागून येणाऱ्या ट्रक ने धडक दिल्याने कार मध्ये बसलेल्या 5 डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
प्रचंड वेगात असलेली स्कॉर्पियो कार डिवायडर तोडून पलटी झाली. त्याचवेळी मागून वेगात आलेला ट्रक या कारला धडकला. अपघात इतका भीषण होता की, स्कॉर्पियोमधील पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व डॉक्टर्स सैफई मेडिकल यूनिवर्सिटीमध्ये प्रॅक्टिस करत होते. उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये आगरा-लखनऊ एक्सप्रेस-वे पर हा भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत मरण पावलेले सर्व
डॉक्टर्स सैफई मेडिकल यूनिवर्सिटीमधून पीजीचा अभ्यास करत होते. माहिती मिळताच पोलिसांसोबत युनिवर्सिटीचा स्टाफ घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सांगितलं की, सकाळी चारच्या सुमारास कंट्रोल रुमला अपघाताची माहिती मिळाली.
अपघात कसा घडला?
या भीषण रस्ते अपघातात मरण पावलेल्या पाचही डॉक्टरांची ओळख पटवण्यात आली आहे. डॉ.अनिरुद्ध वर्मा, डॉ.संतोष कुमार मौर्य, डॉ.जयवीर सिंह, डॉ अरुण कुमार आणि डॉ. नरदेव अशी या डॉक्टरांची नाव आहेत. हे सर्व डॉक्टर लखनऊ लग्नासाठी गेले होते. तिथून परतत असताना भीषण अपघात झाला. डॉक्टरांची वेगात असलेली स्कॉर्पियो कार डिवायडर तोडून रस्त्याच्या पलीकडे गेली. त्याचवेळी मागून वेगात आलेल्या ट्रकने कारला धडक दिली.
प्राथमिक चौकशीतून काय समोर आलं?
पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत. ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोप असल्याने हा अपघात झाल्याच प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. या स्कॉर्पियोचा नंबर 80 HB 070 आहे. ज्या ट्रकची धडक बसली, त्याचा नंबर RJ 09 CD 3455 आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण अपघाताची दखल घेतली. सीएम योगी यांनी या भीषण अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |