अपघात

कार चा भयानक अपघात ; रेलिंग वर चढली कार , एकाचा मृत्यू 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी

             शहरातील कामठी रस्त्यावर मंगळवारी सकाळी एक भयानक अपघात झाला आहे. कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने त्याचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने कार रेलिंग वर चढली.आणि रेलिंग कार च्या समोरून घुसून मागच्या बाजूने बाहेर निघाल्याने रेलिंग ने  गळा चिरून एकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन निंबाळकर (26 वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत रोशन आणि त्याचा मित्र अभिषेक परमार, सय्यद आमिर शहजाद सय्यद साबिर हे कारमध्ये एकत्र प्रवास करत होते. कामठीवरून नागपूरकडे येत असताना कामठी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तान समोरील गरुड चौक परिसरात पहाटे 4.30 वाजताच सुमारास ही घटना घडलीय.

अपघात नेमका कसा झाला?

सय्यद अमीर शहजाद सय्यद साबीर हा कार चालवत असताना नियंत्रण भरधाव कारच वळणावर नियंत्रण सुटून रस्त्यालगच्या रेलिंग मध्ये घुसली. हा अपघात झाला त्यावेळी कारचा वेग इतका जास्त होता की समोरच्या बाजूने कारमध्ये घुसलेले रेलिंग कारच्या आतून गळा चिरत बाहेर निघाले. यावेळी कार मधील रोशन निंबाळकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींवर कामठी येथे शासकीय उपरुग्णालय येथे उपचार सुरू आहे. तसेच मृत रोशनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close