ती सहज बाजारात गेली आणि तिने पतीला ज्या अवस्थेत पाहिले त्यानंतर ….
ग्वाल्हेर ( मध्यप्रदेश ) / नवप्रहार डेस्क
मागील काही काळात कुटुंबीयांनी नपुंसक असलेल्या मुलाचे लग्न लावून दिले. पण मुलगा लग्नाला बराच काळ उलटून देखील लैंगिक संबंध ठेवत नसल्याच्या तक्रारी घेऊन काही विवाहित तरुणी पोलिसांकडे पोहोचल्याचा तक्रारी पोलीस दप्तरी आहेत. अशीच एक घटना मध्यप्रदेश च्या ग्वाल्हेर येथून उघडकीस आली आहे. लग्नाला चार वर्षे होऊन देखील पती शारीरिक संबंध ठेवत नव्हता. विचारले असता त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचे कारण देत होता. पत्नी एक दिवस बाजारात गेली असता तिला पती महिलेच्या वेशात भीक मागताना दिसला. तिने जाब विचारला असता त्याने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करीत असल्याने याSइ करावे लागते असे सांगितले. पण तिला शंका आल्याने तिने सरळ पो. स्टे. गाठत तक्रार दाखल केली. या घटनेने परिसरातील लोकही चक्रावून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने २०२० मध्ये लग्न केले. या काळात संबंधित महिलेच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. याबाबत महिलेने पतीकडे विचारणा केली असता आपल्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचे त्याने कारण दिले. यानंतर महिलेने तिच्या पतीला बाजारात महिलेच्या वेशात पाहिले. त्याने साडी घातली होती आणि महिलांसारखा मेकअप देखील केला होता. यानंतर महिलेने जवळचे पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू झाला आहे.
महिलेने असा दावा केला आहे की, तिच्या कुटुंबीयांनी लग्नात पतीला लाखो रुपये आणि संसारोपयोगी साहित्य हुंडा म्हणून दिले. लग्नानंतर तिच्या पती वैद्यकीय कारण देत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार द्यायचा. त्यानंतर महिलेच्या सासरच्या लोकांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. क्षुल्लक गोष्टींवरून सासरचे लोक वारंवार वाद घालायचे. एवढेच नव्हेतर, त्यांनी अनेकदा तिला उपाशी ठेवले. आजारी पडल्यास तिला माहेरी पाठवले जायचे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला काही दिवसांपूर्वी बाजारात खरेदी करण्यासाठी गेली, तिथे पतीला महिलेच्या वेशात तिला मोठा धक्का बसला. त्याने साडी घातली होती, हातात बांगड्या अंगावर दागिने घालून तो रस्त्यावर भीक मागत होता. महिलेने पतीला जाब विचारला असता त्याने सांगितले की, तो एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतो आणि त्याला कधीकधी स्त्रीसारखे कपडे घालावे लागतात.मात्र, आपली फसवणूक झाल्याचे समजून महिलेने पोलिसांत तक्रार दिली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकारी याला हुंड्यासाठी छळ आणि भावनिक अत्याचाराचे प्रकरण मानून पतीच्या कृत्याची अधिक चौकशी करत आहेत.
दरम्यान, अशी घटना पहिल्यांदाच घडली नसून याआधीही अशाप्रकारच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा घटनांमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. महिलाची फसवणूक करणाऱ्या अशा लोकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित महिलांच्या नातेवाईक करत आहेत.