राजकिय

तरोडा येथे कॉग्रेस कमिटी च्या नवनियुक्त पदाधिकारी सत्कार सोहळा

Spread the love

 

 

घाटंजी तालुका प्रतिनिधि- सचिन कर्णेवार

घाटंजी तालुक्यातील तरोडा येथिल जगदंबा देवी संस्थान येथे नुक्तेच कॉग्रेस पक्षातील नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा पार पडला. यात

रुपेशभाऊ कल्यमवार यांची तालुका काँग्रेस कमिटी घाटंजीच्या अध्यक्ष पदी तर आकाश आत्राम यांची आदिवासी विकास परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने या दोन्हीं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जगदंबा देवस्थान तरोडा येथे ग्रामस्थ व समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थितीत राज्याचे माजी मंत्री तथा आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अँड शिवाजीराव मोघे होतें. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजकरणाच्या माध्यमांतून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी नवनियुक्त पदाधिका-यांनी कार्यरत राहावे असे मत व्यग्त करत दोन्ही पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा.जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव मेश्राम, स्वामीभाऊ काटपेलीवार,वैजयंती ठाकरे, इकलाक खान, अरविंद चौधरी, संजय आरेवार यांच्या सह कार्यक्रम आयोजक विठ्ठल नैताम, भारत वाडगुरे, प्रशांत गावंडे, वामन खंदारे यांच्या सह गावातील कॉग्रेस पक्ष सदस्य,गावकरी मोठ्या संखेणी उपस्थित होते.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close