लिकेज मुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया:
जयस्तंभ चौक परिसर घाणीच्या साम्राज्यात
मोर्शी / ओंकार काळे
शहरातील जयस्तंभ चौक येथील पाणी पुरवठा लाईन लिकेज असल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावर येत आहे पर्यायाने या ठिकाणी अस्वच्छता पसरते. हे पाण्याचे लिकेज दुरुस्त करावे अशा आशयाचे निवेदन सुद्धा तेथील व्यवसायिकांनी दिले आहे परंतु नगर परिषदे तर्फे यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.हे लिकेज ताबडतोब दुरुस्त करावे अशी मागणी याप्रसंगी होत आहे.
शहरातील जयस्तंभा च्या समोरच असलेल्या मिलन हॉटेल जवळील पाण्याची पाईप लाईन अंदाजे दोन महिन्यापासुन लिकेज आहे. त्यामुळे जयस्तंभ चौक ते दत्त मंदिर पर्यंत लिकेज चे पाणी दररोज वहात जात असून शेकडो लिटर पाण्याची नासाडी होते.
जयस्तंभ ते दत्त मंदिरापर्यंत या लिकेज च्या पाण्यामुळे प्रचंड स्वरुपात घाण पसरलेली आहे.
तसेच पाणी पुरवठा बंद केल्यानंतर संपुर्ण गढुळ पाणी परत पाईप लाईन मध्ये जाऊन नागरिकांच्या नळाद्वारे त्यांच्या घरात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भविष्यात अतिसार किंवा अन्य संसर्गजन्य आजाराचा सुध्दा धोका संभवतो.
हे लिकेज बंद करून पाण्याचा अपव्यव थांबवावा जेणेकरून परिसरात अस्वच्छता होणार नाही तसेच नागरीकांना गढूळ पाणी मिळणार नाही या हेतूने नगर परिषदेला
मोबीन, तुषार अंबुलकर,संकेत तिवारी, जगदीश तिवारी, प्रशांत कपले,योगेश गावंडे, विजय गावंडे, विजय श्रीवास, पंकज केचे,मंगलाबाई गिरी, प्रशांत वानखडे, धिरज वानखडे यांनी निवेदन दिले आहे.
एकीकडे पाणी बिल न भरल्यामुळे ग्राहकांचे पाणी कनेक्शन तोडण्यात येत आहे तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.त्यामुळे हे लिकेज बंद करून पाण्याच्या अपव्यव थांबवावा अशी मागणी होत आहे.