विदेश

शिक्षिका झाली 13 वर्षाच्या विद्यार्थ्यांची आई 

Spread the love

अमेरिका / नवप्रहार डेस्क

                 शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार अमेरिकेतील एका शाळेत घडला आहे. हा घृणीत प्रकार वाचून तुम्हालाही धक्का बसेल. खेळण्या बागडण्याच्या वयात एक विद्यार्थी मुलाचा बाप बनला आहे.  या शिक्षिकेचे तिच्या 13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध होते. ही शिक्षिका चार वर्षे विद्यार्थ्यासोबत राहिली. या काळात तिने अनेकवेळा मुलावर लैंगिक अत्याचार केले. महत्वाचे म्हणजे शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या मुलालाही जन्म दिला.

ही घटना उघडकीस आल्यानंतर आता या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. केप मे काउंटी अभियोक्ता कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या शिक्षिकेचे नाव लॉरा कॅरॉन असून, ती 2016 ते 2020 दरम्यान तिच्या घरी या मुलासोबत राहत होती. कॅरॉन ही पिडीत विद्यार्थी आणि त्याच्या भावाला पाचव्या वर्गात शिकवत होती. यावेळी ती पिडीत मुलाच्या जवळ आली.

या दरम्यान विद्यार्थ्याचे कुटुंब आणि कॅरॉन यांच्यातही जवळचे नाते निर्माण झाले. पुढे विद्यार्थ्याच्या वडिलांनी त्याला आणि त्याच्या भावाला कॅरॉनच्या घरी राहून अभ्यास करण्याची परवानगी दिली. यानंतर 2016 मध्ये दोघेही कॅरॉनच्या घरी कायमस्वरूपी राहू लागले. यावेळी पिडीत विद्यार्थी केवळ 11 वर्षांचा होता.

या संधीचा फायदा घेऊन कॅरॉनने विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि ती गर्भवती राहिली. पुढे तिने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म झाला तेव्हा ती 28 वर्षांची होती, तर विद्यार्थी 13 वर्षांचा होता. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये, विद्यार्थ्याच्या वडिलांनी फेसबुक पोस्टमध्ये कॅरॉनच्या मुलाला पहिले.

त्यावेळी हा मुलगा व आपला मुलगा यांच्यात साम्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  त्यांचा संशय बळावला व त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि तपास सुरू केला. पुढे पीडित मुलाने कॅरॉनसोबत शारीरिक संबंध असल्याचे कबूल केले. तो म्हणाला की जोपर्यंत त्याच्या वडिलांनी फेसबुक पोस्टमध्ये साम्य पहिले नाही, तोपर्यंत तो कॅरॉन शिक्षकाच्या संपर्कात होता.

बुधवारी शिक्षिका कॅरॉनला अटक करण्यात आली. तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा आणि मुलाचे कल्याण धोक्यात आणल्याचा आरोप आहे. मुलाला केप मे काउंटी सुधारक सुविधा येथे ठेवण्यात आले आहे. त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close