राजकिय

उद्धव ठाकरे यांचा शिंदे यांना दे धक्का

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

                    जसजशी नामांकन भरण्याची तारीख जवळ येत आहे. तसतसे राजकीय वातावरण तापत चालले आहे. ज्यांना स्वतःच्या पक्षात भाव मिळाला नाही. ते आता इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारतांना दिसत आहेत. असाच प्रकार घडला असून शिंदे गटातील माजी आमदार व उपनेते बबनराव घोलप यांनी उबाठा गटात प्रवेश केला आहे. हा शिंदे साठी मोठा धक्का मानला जात आहे.

बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच देवळाली विधानसभा मतदारसंघात बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. उमेदवाराची घोषणा होताच पुन्हा एकदा बबनराव घोलप हे देखील स्वगृही परतले आहेत. वडील बबनराव घोलप यांनी जरी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असला तरी देखील योगेश घोलप मात्र शिवसेना ठाकरे गटात होते. त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यानंतर बबनराव घोलप यांनी देखील पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

बंडखोरी रोखण्याच आव्हान

दरम्यान आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जवळपास जागा वाटप निश्चित झालं आहे, उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील झाली आहे. मात्र जे नेते इच्छुक असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही असे अनेक जण आता बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं दिसून येत आहे. या बंडखोरीचा मोठा फटका हा त्या-त्या मतदारसंघात संबंधित पक्षाला बसू शकतो. त्यामुळे आता पक्षांतर्गत होणारी बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान हे सर्वच राजकीय पक्षांपुढे असणार आह

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close