हटके

त्याने उलटे बसून चालवली बाईक अन…

Spread the love

              सध्या कुठल्याही याची रील किंवा व्हिडीओ बनवून तो सोशल मोडियावर टाकायचा हा फॅड तरुणाई मध्ये वाढत चालला आहे. काही लाईक्स आणि व्ह्युज मिळवण्यासाठी तरुणाई नसले ते उद्योग करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. याच नादात एक तरुण बाईक वर उलटे बसून तो चालवण्याचा प्रयत्न करीत आहे. असे या व्हिडिओत दिसत आहे. पण ……

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला होत लावला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. रील बनवण्यासाठी या तरूणाने असे काही केले आहे की, त्याचा त्याला चांगलाच फटका बसला आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही देखील हैराण व्हाल.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण बाईकवर बसलेला आहे. पण तो इतर लोकांसारखा सरळ बसलेला नाही. तर तो बाईकवर उलटा बसण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने उलटे बसून हाताने मागे हँडल धरले आहे. तो आधी बाईक रेस करतो, मग क्लच दाबतो आणि गियर शिफ्ट करतो. मग तो हळू हळू बाईक पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु गाडीचा वेग अचानक वाढतो. यामुळे काही अंतर गेल्यावर तो बाईकवरून खाली पडतो. यात त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र असा मूर्खपणा केल्याने गंभीर दुखापतही होऊ शकते. हे त्याच्या लक्षात येत नाही. तो पुन्हा तसेच करायला जातो.

 

 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RVijayavad37948 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. अनेकांनी याबर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, हे देखील ठीक आहे. तर दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, ‘यार, तो खूप चुकीचा माणूस आहे. तसेच अनेकांनी हसणाऱ्या इमोजीही कमेंट केल्या आहेत.या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये काळ उलटला आहे मी सरळ चालणार नाही. असे लिहिले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close