हटके

येथे मरण तळहातावर घेऊन जीवन जगावे लागते

Spread the love

           जंगलाचे नियम आणि जगण्याची पद्धत ही फारच वेगळी आहे. येथे लहान प्राण्यांना जीवन तळहातावर घेऊन जगावे लागते. कधी त्यांचा गेम होईल याचा नेम नसतो. इतर व्हिडिओ प्रमाणे जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात. त्यात हिंस्त्र पशूंना प्राण्यांची शिकार करताना दाखवले जाते. हे व्हिडीओ आपल्या साठी मनोरंजनाचे साधन असले तरी जंगलातील प्राणी कोण कधी कोणाची शिकार बनेलं याचा नेम नसतो.

खरे तर माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर, इतर प्राणी प्रत्येक दिवस जगताना मरणाची भीती बाळगून जगतात.

समाजमाध्यमांवर सतत प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे; ज्यात एका बिबट्याने हरणाच्या कळपावर झडप घातल्याचे दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, हरणाचा एक कळप जंगलामध्ये फिरत असताना अचानक त्यांना कोणीतरी आपल्यावर हल्ला करणार असल्याची चाहूल लागते. त्यामुळे ती पळू लागतात आणि तितक्यात एक बिबट्या कळपातील एका हरणावर हल्ला करतो आणि त्याला आपल्या जबड्यात पकडून घेऊन जातो. बिबट्याने हुशारीने केलेला हा हल्ला पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @thebigcatsempire या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत जवळपास ११ हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “बिबट्या एक उत्तम शिकारी आहे.” दुसऱ्याने लिहिलेय, “बापरे हरणाला कसं पकडलं बिबट्यानं.” तिसऱ्याने लिहिलेय, “परफेक्ट व्हिडीओ क्लिक केला आहे.”

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत वाघाने तळ्यात पाणी पिणाऱ्या हरणाची शिकार केली होती; तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सिंहाचे काही शावक म्हशीची शिकार करताना दिसले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close