मुलीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या आईला मुलीने प्रियकराच्या मदतीने संपवले

आगरा/ एटा – प्रतिनिधी
उत्तरप्रदेश मधुन एक अविश्वसनिय घटना उघड झाली आहे. मुलीचे गावात प्रेमसंबंध असल्याने आईने तिला मामाच्या गावी पाठवले. पण तिथे सुद्धा तिने शेजारी तरुणाशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. ही बाब मामाला माहिती झाल्यावर त्यांनी बहिणीला (मुलीच्या आईला) याबद्दल कल्पना दिली. तिने मुलीला घरी परत बोलावले. पण यानंतर सुद्धा तिचे प्रियकराशी मोबाईल वर बोलणे सुरू होते. त्यामुळे आईने मुलीच्या हत्येची सुपारी तीच्या प्रियकराला दिली. पण या बद्दल प्रियकराने मुलीला सांगितले. तेव्हा मुलीने तू माझ्या आईला संपव म्हणजे मी तुझ्याशी लग्न करेल . असे प्रलोभन दिले. आणि दोघांनी मिळून आईची हत्या केली.
एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधामुळे तिच्याने आईने मुलीच्या एका प्रियकराला 50 हजार रुपयात आपल्याच मुलीची सुपारी दिली. मात्र, तिचा प्रियकर आणि अल्पवयीन मुलगी हे दोन्ही चतुर निघाले. आधी त्यांनी महिलेला मुलीच्या हत्येचा बनावट फोटो पाठवला. तसेच पैसे न मिळाल्याने नंतर तुमची मुलगी जिवंत असल्याचे सांगितले. तसेच यानंतर या मुलीने आणि तिच्या प्रियकराने महिलेची हत्या केली.
उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यातील जसरथपूर परिसरातील या घटनेने खळबळ उडाली आहे. याठिकाणी रहिवासी असलेली एका अल्पवयीन मुलीचे गावातीलच अखिलेश सोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसी प्रियकरासोबत पळून गेल्यावर तिच्या नातेवाईकांनी ती हरवल्याची तक्रार नयांगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिच्या प्रियकराला तुरुंगात टाकले होते. तर मुलीला तिची आई अलका हिने आपल्या माहेरी फर्रूखाबाद पाठवले.
त्यानंतर मृत महिलेच्या अल्पवयीन मुलगी तेथे शेजारी राहणाऱ्या सुभाषच्या प्रेमात पडली. या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या मामा माहिती होताच त्यांनी आपल्या बहिणीला म्हणजे मुलीच्या आईला याबाबतची माहिती दिली. यानंतर महिलेने आपल्या मुलीला आपल्याजवळ परत आणले. मात्र, घरी आल्यानंतरही मुलगी आपला प्रियकर सुभाषसोबत फोनवर बोलू लागली.
याचदरम्यान, आधी आईने आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला. तिने एका बहाण्याने मुलीचा प्रियकर सुभाष याला बोलावले आणि आपल्या मुलीची हत्या करण्यास सांगत 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. सुभाषने ही ऑफर स्विकार केली. यानंतर सुभाषने याबाबतची सर्व माहिती आपली अल्पवयीन प्रेयसीला दिला. सुभाषने सांगितले की, तुझ्या आईने मला तुझी हत्या करण्याची सुपारी दिली आहे. यानंतर सुभाष आपल्या प्रेयसीला घेऊन आगरा याठिकाणी आला. याठिकाणी प्रेयसीचे हत्या झाल्याचे बनावट फोटो काढले.
याबाबत अतिरिक्त एसपी राजकुमार सिंह यांनी सांगितले की, सुभाषने फोटो प्रेयसीच्या आईला पाठवले आणि त्यानंतर तो पैशांची मागणी करू लागला. तसेच तिने पैसे न दिल्याने प्रेयसीची हत्या केली नाही आणि ती त्याच्या सोबतच, असा खुलासाही केला. यानंतर सुभाषने तिच्या आईलाही आग्रा येथे बोलवले. यानंतर तीन जण सोबत एटा येथे गेले.
एटा गेल्यावर नाबालिक मुलीने आपल्या प्रियकराला आईची हत्या करण्यास सांगितले. याबदल्यात ती त्याच्याशी लग्न करेन, असे आश्वासनही दिले. यानंतर नियोजनानुसार, सुभाष आपल्या प्रेयसीच्या आईला बाजरीच्या शेतात घेऊन गेला. त्याठिकाणी तिची अल्पवयीन मुलगीही आली आणि दोघांनी मिळून आईची हत्या केली. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपी प्रियकर आणि प्रेयसीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.