मुख्याध्यापका कडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण
पीडितेच्या वडिलांनी एसएचओ ला लिहिले पत्र
रांची / नवप्रहार मीडिया नेटवर्क
झारखंड मधून एक मन हेलवणारी घटना समोर येत आहे.यानंतर जर विद्यार्जन करण्याच्या ठिकाणी असा घृणीत प्रकार घडत असेल तर मग ईतर ठिकाणी काय ? असा प्रश्न मनाला स्पर्शून जातो.ज्या वयात मुलींना लैंगिक संबंधाबद्दल ज्ञान देणे जरुरी असते त्यावेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल ? याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. या नंतर आरोपी मुख्याध्यापकाला नागरिकांनी मारहाण केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. एका पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी लिहिलेले पत्र त्याने एसएचओला शेअर केले. त्यात मुख्याध्यापकाने १३ वर्षांच्या विद्यार्थिनीचा कसा प्रकारे विनयभंग केला हे लिहलेले आहे.
माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी लिहिले, ‘हे पत्र एका असहाय वडिलांनी बरहेट – साहिबगंजच्या ठाणेदारांना लिहले आहे. पत्र वाचून मन हेलावत आहे.उत्क्रमित उच्च विद्यालय, पंचकठिया येथील मुख्याध्यापक मोहम्मद शमशाद अली यांने विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलीने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला आणि प्रकरण पुढे सरकले तेव्हा इतर विद्यार्थिनीही पुढे आल्या आणि त्यांनी झालेला त्रास कथन केला.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन पोलिसांना कारवाई करण्यास सांगतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षकाची जात, धर्म पाहून कारवाईत हलगर्जीपणा करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मारहाणीनंतर जखमी झालेला मोहम्मद शमशाद अली यांच्यावर स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, मुख्याध्यापक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्यांना आपल्या खोलीत बोलावून त्यांचा विनयभंग करत असे.
या प्रकरणात पीडितेंची संख्या १२ च्या जवळपास आहे. या सर्वांनी आपल्या पालकांना आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी शाळेत पोहोचून मुख्याध्यापकांकडे चौकशी केली. दरम्यान मुख्याध्यापकाने महिलांचाही विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच प्रखंड शिक्षा प्रसार पदाधिकारी मोहम्मद अहमद हुसेन यांनीही या प्रकरणाची माहिती रुग्णालयात जाऊन घेतली आहे. मात्र शमशाद अली यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. चिठ्ठीत विद्यार्थ्याने दोन दिवसांपासून शाळेत जाणे बंद केल्याचे लिहिले आहे, त्यावर वडिलांनी कारण विचारले असता मुख्याध्यापकांच्या गैरकृत्याबद्दल सांगितले.