राजकिय

दादांना धक्का ; उमेदवारी घोषीत केलेल्या उमेदवाराने साथ सोडली 

Spread the love

फलटण / नवप्रहार डेस्क 

विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून अनेक पक्ष कामाला लागले आहेत. काहीच दिवसात आचार संहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्ष बेरजेचे राजकारण करत आहे. अश्यतच अजित दादा पवारांना मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार यांनी मोठ्या विश्वासाने ज्या उमेदवाराला विधानसभेचं तिकीट दिलं त्याचे घात करुन दादांची साथ सोडली. इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत तुतारीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या फलटणच्या राजकारणाची कुजबूज राज्यात सुरू झाली आहे. फलटण येथील 14 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात आमदार दीपक चव्हाण यांच्यासह अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तुतारी सोबत जाण्याचा घेतला निर्णय आहे.

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सध्या आपली भूमिका तटस्थ असल्याचं म्हटलं आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुगली टाकून ते आपली काय भूमिक घेतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महायुतीचा प्रचार करणार नाही अशी भूमिका आपली असल्याचं रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. सध्या रामराजे नाईक निंबाळकरांचा गट हा तुतारी चिन्हाच्या दिशेने वाटचाल करत असून आज रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार दीपक चव्हाण, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीत कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर संजीव राजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी 14 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यामध्ये तुतारी चिन्हाच्या सोबत जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. मात्र माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवत या पुढील काळात महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या बैठकीत जाहीर केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close