क्राइम

35 वर्षीय शिक्षकाकडून 42 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ 

Spread the love

तामिळनाडू / नवप्रहार डेस्क

                  शाळेतील शिक्षकां कडून विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेत दिवसागणिक वाढ होतांना दिसत आहे. मागील काही दिवसात शाळेतील विद्यार्थीनिनीचे शिक्षक अथवा कर्मचाऱ्यांकडून लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. आता तामिळनाडू मधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील एका शाळेत शिक्षक असलेल्या 35 वर्षीय शिक्षकाने 42 अल्पवयीन विद्यार्थिनींचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

12 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना उघडकीस आली. जेव्हा नववी आणि दहावीत शिकणाऱ्या काही पीडित मुलींच्या पालकांनी चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार केली. तेव्हा चाईल्ड हेल्पलाईनने 13 ऑगस्टला शाळेत चौकशी केली. तेव्हा अनेक मुलींनी मुथुकुमारनने लैंगिक छळ केल्याचे म्हटले.

चाईल्ड हेल्पलाईनने यावर सविस्तर चौकशी करून मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. तेव्हा प्रशासनाने मुथुकुमारनला तत्काळ निलंबीत केले. पण त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही. त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनने तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हा मुथुकुमारनला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close