बहिणीच्या मृत्यूनंतर ही त्याने त्यांना दिले 19 . 18 लक्ष

मुंबई / नवप्रहार डेस्क
भाऊ हा बहिणीच्या इभ्रतीसाठी वाट्टेल ते करायला तयार असतो. याच गोष्टीचा फायदा घेत काही लोकांनी भावाला मृत बहिणीचे आक्षेपार्ह फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्या कडून 19लक्ष 18 हजार रु. उकळले. त्याला जवळपास 64 लोकांनी कॉल करून ब्लॅकमेल केले . शेवटी संतापलेल्या आणि उधारी करून थकलेल्या भावाने पोलिसांची मदत घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ता तरुणाच्या बहिणीने कदाचित याच कारणामुळे जीवन संपवले असेल असा पोलिसांना शक आहे. .
बहिणीच्या फोटोंवरून काही जण भावाला ब्लॅकमेल करत होते. गुजरातच्या गांधीनगरमध्ये ही घटना घडली आहे.
गांधीनगरच्या कुडासनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने इन्फोसिटी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 64 कॉलर्सनी भावाला फोन करून ब्लॅकमेल केलं आणि मृत्यू झालेल्या बहिणीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी देऊन या ब्लॅकमेलरनी भावाकडून 19 लाख 18 हजार रुपये लुबाडले.
भावाने ज्या फोटोंसाठी ब्लॅकमेलरना पैसे दिले त्या बहिणीचा मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेनं एम.कॉम आणि बीएडचं शिक्षण घेतलं होतं आणि राजकोटच्या एका खासगी शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करत होती. याशिवाय ती शाळेच्या मुलांची खासगी ट्युशनही घेत होती. डिसेंबर 2023 मध्ये भाड्याच्या घरात तिचा मृतदेह आढळून आला होता. तेव्हा राजकोटच्या भक्तीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना तिच्या घरामध्ये कोणतीही नोट मिळाली नव्हती, तसंच तिने जीवन का संपवलं? याची कल्पनाही कुटुंबाला नव्हती.
ब्लॅकमेलरनी भावाला पाठवले फोटो
एनएफएसयूमध्ये शिकत असलेल्या आणि कुडासनमध्ये राहणाऱ्या तिच्या भावाला 23 फेब्रुवारीला व्हॉट्सऍपवर एक मेसेज आला, ज्यात त्याच्या मृत्यू झालेल्या बहिणीचे आक्षेपार्ह फोटो होते. बहिणीचे असे फोटो पाहून आपण हैराण झालो, तसंच फोटो पाठवणाऱ्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. मी पैसे दिले, पण त्यानंतर माझ्या फोनवर वारंवार असे व्हॉट्सऍप मेसेज आणि ऑडियो कॉल यायला लागले, ज्यात अनोळखी व्यक्ती मला बहिणीचे आक्षेपार्ह फोटो पाठवत होते. फोटो पाठवल्यानंतर माझ्याकडून वेगवेगळ्या क्रमांकाच्या युपीआय आयडीवरून पैसे मागितले जायचे, असं या महिलेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे.
जेव्हा मी पैसे द्यायला नकार द्यायचो तेव्हा माझ्या बहिणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जायची, त्यामुळे मी त्यांना पैसे देत होते. त्यांनी 64 वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज आणि ऑडियो पाठवले. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत वेगवेगळ्या युपीआय आयडीवरून मी 19.18 लाख रुपये दिले. ही रक्कम दिल्यानंतर मी मित्रांकडूनही पैसे उधार घेतले, असं या भावाने सांगितलं आहे.
शेवटी ब्लॅकमेलरच्या जाचाला कंटाळून मृत महिलेच्या भावाने पोरबंदरमध्ये सायबर क्राईमला संपर्क केला यानंतर ही तक्रार गांधीनगरच्या इन्फोसिटी पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. फॉरेन्सिक एक्सपर्टकडून या फोटोंची तपासणी केली जात आहे. महिलेनेही या फोटोंमुळेच जीवन संपवल्याचा संशय पोलिसांना आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या भावाकडून पैसे लुबाडण्यासाठी हे फोटो पाठवले गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.