सामाजिक

आरक्षणा संदर्भात आदिवासी कोळी महादेव जमातीतील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी एकत्र आले पाहिजे शरद कोळी यांचे आवाहन

Spread the love

चोहोट्टा बाजार प्रतिनिधी

चोहोट्टा बाजार:कित्येक दिवस अन्याय सहन करत राहणार, जमातीसाठी आज शरद कोळी पक्षाचा उपनेता म्हणून नव्हे तर जमातीचा कार्यकर्ता म्हणून या स्टेजवर चढलो आहे विरोधक बोलतात शरद कोळी ला आमदार व्हायचे आहे आमदार होणार पन जमातीच्या पाठित खंजीर खुपसणार नाही.पन आमदार झालो तर जमातीसाठी खंबीरपणे ऊभा राहणार असल्याची ग्वाही देतो असे विधान शिव सेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष कोळी महादेव समाजांचे नेते चोहोट्टा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित आदिवासी कोळी महादेव जमातीच्या जमात बांधवांना संबोधित केले…
मागिल कित्येक वर्षांपासून आदिवासी कोळी महादेव जमातिचे लोकं जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आमरन उपोषण, जलसमाधी, जमिनीत गाडून घेत विविध माध्यमांतून आदिवासी कोळी महादेव जमातिचे लोकं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतू सरकारला राज्यातील नव्वद लाख कोळी बांधवाचा प्रश्नः महत्वाचा वाटत नसल्याने सातत्याने या जमातीच्या आंदोलनाची दखल शासन घेत नसल्याने तसेच आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विरांगणा गितांजली कोळी यांच्या सोबत अकोला पुर्व चे आमदार रणधीर सावरकर यांनी उर्मटपणे वक्तव्य केल्याने समाजाने एकजुटीने समाजाचे अस्तित्व सिद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक युवकांनी आदिवासी कोळी महादेव जमात चा मेळावा घेत कुठल्याही राजकीय पक्षाच्या समर्थनात किंवा विरोधात हा मेळावा नसुन केवळ आदिवासी कोळी महादेव जमातीच्या एकत्रिकरणासाठी मेळाव्याचे आयोजन दिं ०६ ऑक्टोबर रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रांगणात सायंकाळी चार वाजता सभेचे आयोजन केले होते…

आदिवासी कोळी महादेव जमातीच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे महर्षी वाल्मिकी मठ संस्थान सामदा तर प्रमुख उपस्थिती म्हणून गितांजली ताई कोळी, पवनपाल महाराज राष्ट्रीय किर्तनकार,मिराताई कोलटके, कोळी जमातीचे अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव, विजयकुमार घावट,व कोळी महादेव जमातीचे प्रमुख आयोजक पाहुणे उपस्थित होते. यावेळी धाडस सामाजिक संघटनेच्या विदर्भ प्रदेशाध्यक्षपदी राम सुरडकर यांची निवड करण्यात आली. अकोला वाशिम अमरावती बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या लोकांनी कृषी उत्पन्न चोहोट्टा बाजार समितीचे मैदान फुलुन गेले होते. राजकीय पक्षाच्या सभेला लोकांना गाड्या करुन आनावे लागते. तर या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने आदिवासी कोळी महादेव जमातिचे लोकं स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहिल्याने आदिवासी कोळी महादेव जमात मेळाव्याच्या आयोजकांनी आनंद व्यक्त केला …..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close