घाटंजी येथील खेळाडूचे लाठी-काठी चॅम्पियनशिप मध्ये सुयश.
.
घाटंजी ता प्रतिनिधि -सचिन कर्णेवार
नुकत्याच भद्रावती (चंद्रपूर) येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सिलंबम (लाठी-काठी) चॅम्पियनशिप मध्ये घाटंजी येथील खेळाडूनी उत्तम कामगिरी करत पारितोषिक पटकावले. यात असोसिएशन ऑफ मार्शल आर्ट व छावा प्रतिष्ठान शिवकालीन मर्दानी खेळाचे खेळाडू यांनी वयोगटा मध्ये (गोल्ड मेडल) धनक्षी दिलीप चंद्रमे, अनुज सुनील जगताप, वेदांत रमेश नागरे. (सिल्वर मेडल) पारितोषिक पटकावत आपल्या कलेची छाप उमटवली. तसेच मोहीत अविनाश चरडे, मृणाली जाचक, साई चरडे. (बाॅन्स मेडल) श्रद्धा अक्कलवार, आदित्य नगणुरवार, प्रज्वल जगताप यानी उत्तम खेळ खेळत गावाचे नाव उज्वल केले याबद्ल सर्व खेळाडूचे व शिक्षकांचे अभिनंदन व सत्कार घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार निलेश सुरडकर साहेब यांच्या हस्ते पोलिस स्टेशन घाटंजी येथे करण्यात आला.यावेळी प्रशीक्षक रामराव राठोड सर, सुनील जगताप, दिलीप चंद्रमे, राजेश नगणुरवार सर, डाॅ. रमेश नागरे, निलेश राउत, अविनाश चरडे या सह ईतरही शिक्षक, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
ooooooooooooooo