अंजनगांवसुर्जी येथे पत्रकार दिन संपन्न

*
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगांवसुर्जी दी पाॕवर आॕफ मीडीया, ,तानुबाई बीर्जे पत्रकार परीषद ,अ.भा.ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने संत रुपलाल महाराज संकुल पान अटाई येथे पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर व महाराष्ट्राच्या पहील्या महीला संपादीका तानुबांई बीर्जे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून “पत्रकार दिन” साजरा करण्यात आला.
दरवर्षी ३ ते १२ जानेवारी या दहा दिवसात जिजाऊ सावित्री दशरात्रोत्सव चे आयोजन केल्या जाते या दशरात्रोत्सवाच्या माध्यमातून अनेक समाजाभीमुख कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते दरवर्षी प्रमाने यंदाही पत्रकार दिवस साजरा करण्यात आला,यावेळी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचा भाजपा सरचिटणीस डॉ विलासजी कविटकर, व मान्यवंरांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन तालुक्याचे वरीष्ठ पत्रकार साप्ताहीक ग्रामवैभवचे संपादक शिवदास मते ,उदघाटक म्हणुन अंजनगांवसुर्जी चे ठाणेदार प्रकाश अहीरे प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे , डाॕक्टर असो.चे अध्यक्ष डाॕ. विलास कवीटकर, ता अध्यक्ष मनोहर मुरकुटे,सुधाकर टीपरे , सुरेश दादा साबळेहे मंच्यावर उपस्थित होते पत्रकार दिवसाचे औचीत्यावर पत्रकारअशोक पिंजरकर व रविंद्र वानखडे यांचा सत्कार कण्यात आला या वेळी शहर तथा ग्रामीण भागातील हींदी, मराठी दैनीकांचे पत्रकार बांधवासह ईले.मीडीया चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते.
या वेळी कार्यक्रमाचेअध्यक्ष शिवदास मते यांनी ६जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो,दर्पण व दिनबंधु पासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे. लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग, वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून पत्रकारीता करीतआहेत आणि आपल्या भागाचे, समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. पत्रकारांनी आरोग्य सांभाळून काम केले पाहिजे.बातमी देताना बातमीचि सत्यता, खरेपना पडताडुन बातमी करावी,खरी बातमी देनारा पत्रकार भयमुक्त असतो ,असे संभोदीत करुण समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.