शहरात स्वच्छता दौड स्पर्धा संपन्न
मोर्शी (ओंकार काळे ):- नगर परिषद मोर्शी द्वारा स्वच्छता पंधरावडा अंतर्गत दिनांक १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक २८/०९/२०२४ रोजी नगर परिषद मोर्शी आणि उपविभागीय पोलीस कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
स्वच्छता दौड दिनांक २८/०९/२०२४ रोजी सकाळी ७.00 वाजता सिंभोरा चौक ते सिंभोरा रोडच्या दिशेने आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तहसीलदार राहुल पाटील, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, नगर परिषदेच्या ब्रँड अँम्बेसेडर श्रीमती पूनम राहुल मोहोड, माजी नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे, सागर ठाकरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पराग वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यामध्ये १४ ते १८ वयोगटातील मुले व मुली यांची ५ किमी धावण्याची स्पर्धा,१८ वर्षावरील मुले व मुली यांची ५ किमी. धावण्याची स्पर्धा व ५० वर्षावरील स्त्रिया व पुरुषांची ३ किमी चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण 500 स्पर्धकांनी या दोन स्पर्धेत भाग घेतला. विजेते स्पर्धकाना दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
या स्वच्छता दौड यशस्वी करण्यासाठी नगर परिषद मोर्शी येथील कार्यालय अधीक्षक अमोल ढोले, भूषण पावडे,अश्विनी खिराडे,अर्चना बडगे,मिनेश सूर्यवंशी, संगीता मनवर, मीनल तट्टे, आशा वडेकर सुरभी श्रीवास्तव, वैष्णवी राय, प्रियंका बेहरे, गोपाल वाघमारे, संजय भातूरकर, राजेश ठाकरे, राहुल देशमुख, प्रल्हाद दाकोडे, सुशील गुरव, वानखडे, प्रवीण रडके, शेख नसीम, प्रमोद भोजने व नगर परिषद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.