शेंदूरजनाघाट येथे तरूणाची आत्महत्या
वरूड / दिनेश मुळे
शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरात वास्तव्यास असलेल्या गोपाल वामनराव डोईजोड (४२) यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
प्राप्त माहिती नुसार गोपालकडे गावालगतच शेती असल्याने तो सकाळी शेतातुन घरी आला होता. त्याची पत्नी काही दिवसापासून नागपुर जिल्ह्यातील बिस्नुर येथे माहेरी गेली होती. ती गोपाल च्या मोबाईल वर माहेरवरूनच वारंवार कॉल करत होती, परंतु तो आपला मोबाईल उचलत नव्हता. वारंवार रिंग वाजत असल्याने गोपाल फोन का उचलत नाही म्हणून घरी असलेल्या त्याच्या आजारी वडीलांनी वर जाऊन बघितले असता गोपाल गळफास लावलेल्या परिस्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुतकाचा पंचनामा करून मूतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीन रूग्णालयात पाठवला. गोपाल ने गळफास घेवुन आत्महत्या का केली असावी हे वुत्त लिहेतोवर कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे. गोपाल हा घरातील कर्ता पुरूष असल्याने त्याच्या अचानक जाण्याने डोईजोड कुंटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आजारी वडील, पत्नी शितल व विवाहित तिन बहिणी असल्याचे कळते.