क्राइम

कर्वेनगर मधील तो खून अनैतिक संबंधातून 

Spread the love

मुलींच्या समोरच झाली वडिलांची हत्या 

पुणे / नवप्रहार डेस्क 

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत (श्रीमान सोसायटी ) झालेला खून हा चोरीच्या उद्देशाने झाला नसून पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने पत्नी आणि तीच्या प्रियकराने केला असलयाचे पोलिसांनी कसून केलेल्या चौकशीत समोर आले आहे. राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय 42 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. अज्ञात इसमांनी रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवल्याने राहुल यांनी दरवाजा उघडला. मात्र आरोपींनी अचानक राहुल यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. दरम्यान राहुल यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या. मात्र आरोपी तो पर्यत घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तूची लूट करुन पसार झाले होते.

पोलिसांना आधी हा सगळा प्रकार चोरीचा वाटला. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. दोन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पूर्वीदेखील त्यांनी हत्येचा प्लान केला होता. मात्र मागच्या वेळी तो प्लान फसला, अशी माहिती पोलिसांना दिली.

मुलींच्या समोरच वडिलांची हत्या

राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुली आहेत. आरोपींच्या तोंडावर बुरखा असल्याने मुलींनी आरोपींना पाहूनही ओळखता आले नाही. डोळ्यासमोरच वडिलांची हत्या झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close