जि प उच्च प्राथमिक शाळा नेरी येथे रेनकोट व स्कूलबॅगचे विद्यार्थ्यांना केले वाटप
आर्वी / प्रतिनिधी
प्राचार्य मा. श्री रवींद्रभाऊ सोनटक्के* यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नेरी येथे भेट दिली व या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना *रेनकोटचे व स्कूल बॅगचे* वितरण केले याप्रसंगी गावातील सरपंच माननीय बाळाभाऊ सोनटक्के तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री शामरावजी वाळके, ग्रामपंचायत नेरीचे सचिव श्री शेंद्रे साहेब, ज्येष्ठ नागरिक श्री दादारावजी नासरे, आणि निवृत्त शिक्षक श्री नरेंद्रजी कोल्हे ,श्री प्रफुल कांबळे सर उपस्थित होते.
दप्तर व रेणकोट मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
सामाजिक कार्याची आवड असणारे श्री रवींद्र सोनटक्के सर यांनी याआधी सुद्धा विद्यार्थ्यांना *स्वेटर, नोटबुक* वाटप केले आहे.
शाळेकरीता मागेल तेव्हा मदत करण्याचा शब्द त्यांनी यावेळी शिक्षकांना दिला.
जीवनातील खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन प्राचार्य पदापर्यंत पोहोचलेले रवींद्र सर यांनी आपल्या आयुष्याच्या विविध घटनांचा उलगड यावेळेस केला.
त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मेहनतीला तसेच त्यांना परिस्थिती वेळेवर मदत केली अशा सर्वांना त्यांनी याप्रसंगी दिले.
जिद्द आणि चिकाटी कायम ठेवावी आणि याचा भरोशावरच आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळू शकते असे प्रतिपादन त्यांनी विद्यार्थ्यांसमोर केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री विवेक कहारे सर यांनी केले, पल्लवी वाकेकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.