शेतकऱ्यांनसह शिवसेनेने झुणका भाकर खाऊन केली तहसील कार्यालयात दिवाळी साजरी
मंत्री खासदार आमदार तुपाशी शेतकरी मात्र उपाशी अशा घोषणांनी शासनाचा केला निषेध
नांदगाव खंडेश्वर/ प्रतिनिधी
शिंदे फडणवीस सरकारने अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना वाटप न केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर बाळासाहेब राणे विष्णू तिरमारे विलास सावदे व शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनसह तहसील कार्यालयात ठिय्या देऊन कार्यालयातच दिवाळीचे दिवे प्रज्वलित करून शेतकऱ्यांनि सोबत आणलेली झुणका भाकर तहसीलदार यांच्या दालनात खाऊन तहसीलदार यांचे सोबत दिवाळी साजरी केली यावेळी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी याना चिंताग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिमा भेट देण्यात आली मंत्री खासदार आमदार तुपाशी शेतकरी मात्र उपाशी अशा घोषणा देत आंदोलन कर्त्यांनी शासनाचा निषेध केला या दरम्यान दिवाळीचे गाणे गाऊन अनोखे आंदोलन करण्यात आले तात्काळ अतिवृष्टीची मदत देण्यात यावी अन्यथा दिवाळी नंतर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला
नांदगाव तालुक्यात जून जुलै महिन्यांत दोन वेळा ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांची पिके खरडून गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यांनतर ऑगस्ट महिन्यात सलग २२ दिवस पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले सरासरी एक ते तीन क्विंटल पर्यंत उत्पादन मिळल्याने खर्च सुद्धा निघाला नसून काही शेतकऱ्यांना जवळून खर्च करावा लागला नुकसानीचे पंचनामे करण्यात आले मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही शिंदे फडणवीस सरकारने अतिवृष्टीची मदत दिवाळी पूर्वी देऊ अशे आश्वासन सुद्धा दिले होते मात्र दिवाळीचा दिवस उजाळला असतांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही शेकडो शेतकऱ्यांनि या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्यास शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून शासना विरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला यावेळी माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर उपजिल्हप्रमुख बाळासाहेब राणे माजी तालुका प्रमुख विष्णू तिरमारे उपातालुका प्रमुख दिलीप देवतळे बाजार समितीचे संचालक विजय अजबले शहर प्रमुख निलेश इखार माजी सरपंच मधुकर कोठाळे श्रीकृष्ण सोळंके अमोल दांडगे मनदेव चव्हाण रमाकांत मुरादे अक्षय राणे गुणवंत चांदूरकर रत्नाकर खेडकर रवी ठाकूर चेतन डकरे ऋषी धांडे नारायण निचत निलेश डकरे मयूर इखार प्रकाश निचत सुरज डकरे दत्ता मुळे वासुदेव पकडे जयप्रकाश सुने भाष्कार दरोकर महादेव दुधे सत्यम रावेकर पांडुरंग मारोटकर किसनराव चौधरी गजानन गावंडे हरिदास लीचडे सुधाकर केवट अरुण कापडे भागवत लाहे विजय पेटले पवन पुसदकर आशिष हटवार भुमेश्वर गोरे शुभम रावेकर शुभम सावरकर वासुदेव लोखंडे गजानन पोफळे लिलाधर चौधरी अक्षय हिवराळे अक्षय तुपट शुभम ढाकुलकर मनोज ढोके पिंटू तुपट भावेश भांबुरकर सुधाकर गभने कमलेश मारोटकर गजानन चवाळे गजानन ढोरे प्रफुल ठाकरे पवन खेडकर चेतन धवने इत्यादी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते
तहसील कार्यालयाचे प्रवेश दाराला तोरण व झेंडूची फुलांचे हार लावून आंदोलकांनी कार्यालय सजविले व तहसीलदार यांचे कक्षात दिवाळीचे गाणे गात डफळी ढोलकी चोनक वाजवत दिवाळीचे दिवे प्रज्वलित करून तहसीलदारांना दिवाळीचा फराळ भेट दिला मुख्यमंत्री मंत्री खासदार आमदार तुपाशी शेतकरी मात्र उपाशी अश्या आशयाचे चिंताग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिमा देऊन शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला
शेतकऱ्यांच्या मागण्या
तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनि दिवाळी आंदोलन करत हेक्टरी २५ हजार रुपये अतिवृष्टीची सरसकट मदत द्यावी तालुक्यातील विमा धारक शेतकऱ्यांना पीक विमा लागू करावा प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील उंबरठा उत्पन्नाची अट रद्द करावी शासनाने नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी करून ७ हजार रुपये प्रति क्विं व १० हजार रुपये प्रति क्विं प्रमाणे कापूस खरेदी करावा इत्यादी मागण्या केल्या