यावर्षी गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन होणार
*काळानुसार पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करणे गरजेचे*
*मातीच्या मुर्ती महाग झाल्या*
*पिओपी गणेशमूर्ती विकणाऱ्यावर होणार थेट कारवाई*
प्रतिनिधी / आर्वी
७सप्टेंबर ला गणरायाचे मोठ्या-थाटा-माटात आगमन होणार असुन प्रत्येक मंडळ गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असुन ते गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी जय्यत तयारीला लागले आहे. परंतु असे असले तरी पिओपी च्या मुर्तिमुळे,प्रदुषणात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहेत. या मुर्ती पाण्यात तरंगतात आणि नदी, नाल्यात किंवा खोल तलावात गेले असता,त्या आपल्या पायाशी येतात. त्यामुळे ही आपल्या हिंदू धर्माची मोठी विटंबना आहेत??
विशेषतः मातीच्या मुर्ती पाण्यात लवकर विरघळात,त्यामुळे या पर्यावरणपूरक असल्याने प्रदुषणात वाढ होत नाहीत. मातीच्या मूर्ती तयार करतांना मोठे जिकरीचे व मेहनतीचे काम आहेत. त्यासाठी मातीवर मोठी क्रमबध्द प्रकिया करावी लागते. त्यामुळेच शाडूच्या मुर्ती दुप्पट, तिप्पट भावाने विकल्या जातात. या मुर्ती महाग असल्या तर या मातीच्या मुर्ती घेतांना गरिब भक्त धजावत नाही.मातीच्या. मुर्ती सर्वसामान्य नागरिकांना कशा परवडणार??असा जटिल प्रश्न आता निर्माण झाला आहेत.
विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आर्विच्या नगरपालिकेने पिओपी मुर्तीवर पुर्ण पणे बंदी असे जाहिरात फलक काढून गणेश भक्तांना. निर्देश जारी केले आहेत.
राष्ट्रीय हरित लवाद,केन्द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्फत पिओपी मुर्तीवर पुर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने पिओपी गणेश मुर्तीची विक्री करणे, व्यवसाय.व साठवणूक करणाऱ्यावर नियमानुसार दंडात्मक तसेच वेळेप्रंसगी फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची सर्वच संबंधित पिओपी मूर्ती विक्री करणारे व्यापारी व नागरिक यांनी नोंद घ्यावी, असे नगरपालिकेने सर्वांना कळविले आहेत. ईको फ्रेंडली बाप्पा माझा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नगरपालिकेने आर्वीकरांना निवेदनाद्वारे केले आहे.
..दहा ते अकरा दिवस आपण आपल्या लाडक्या गणरायाची स्थापना करून, मनोभावे पुजा-अर्चना करून धार्मिक विधी शास्त्रानुसार नियमितपणे करत असतो. तसेच शेवटच्या अनंत चतुर्थीच्या विसर्जनाच्या दिवशी पारंपरिक व धार्मिक स्त्रोतांत गणेश मुर्तीचे मनोभावे विसर्जन करतो. तसेच निर्माल्य हे नदीपात्रात,तलावात टाकून, नदी, नाले, तलाव तसेच इतर जीवनदायी जलस्त्रोत दूषित करतो. शिवाय विसर्जन झाल्यानंतर गणरायाची मुर्ती नकळतपणे पायदळी येवून आपल्या लाडक्या गणरायाची विटंबना होण्याची. दाट शक्यता असते. या सर्व गोष्टी चा सारासार विचार करता इकोफ्रेंडली बाप्पा माझा ही संकल्पना सर्व भाविक भाविकांनी काळानुसार राबवावी, असे आवाहन पर्यावरण प्रेमी लोकांनी, भक्तांनी केली आहेत.
निसर्गाचा समतोल राखला पाहिजे, असे सर्वांना वाटते. त्यासाठी त्याला प्रत्यक्ष कुतीची जोड हवी. त्यासाठी पर्यावरण हित.लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात पिओपी मुर्तीची विक्री अथवा खरेदी करु नयेत. त्याऐवजी शाळू मातीची मुर्ती स्थापना करावी. तसेच कुत्रिम तलावामध्ये घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करणे, सोयीस्कर व्हावे. मुर्तीची उंची दोन किंवा तिन फुटापेक्षा अधिक नसावी. पिओपी मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे अशा मुर्तिचा गाळ हा विहीर, तलाव,नदी-नाले आणि जलाऊ यांच्या तळाशी साचतो. त्यामुळे जलाशयातील जिंवत प्रवाही झरे. बुजतात तर काही बंद होतात. तदवतच या मुर्तीवरील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण होवून पाण्यातील जलचरांना मोठा धोका. निर्माण होतो. याचाही विचार करणे अगत्याचे आहेत, असे मला वाटते.
डॉक्टर रिपल राणे
आर्वी जिल्हा वर्धा
नदी तलावाचे विविध स्रोत खराब न करता, पर्यावरणपूरक निर्माल्य आणि गणेश विसर्जनासाठीचे आयोजन नगरपालिकेने केले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ तसि माझी वसुंधरा अंतर्गत नगरपरिषद आर्वी यांनी इकोफ्रेंडली बाप्पा माझा पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाला साथ देण्याचे आवाहन मी गणेश भक्तांना केले असुन तशी प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहेत.
प्राध्यापक प्रशांतभाऊ सव्वालाखे
माजी नगराध्यक्ष आर्वी
*गणेश विक्रेते काय म्हणतात*
यावर्षी गणेश मुर्ती काही प्रमाणात महाग असल्या तरीही विधीवत पुजेसाठी मुर्ती लागते. दुसरीकडे पुजेचे साहित्य ही गरजेचे असल्याने गणेश भक्त खर्चात कुठे कपात करावी,या विचारात आहेत. आमच्या भक्तांनी पिओपी मुर्ती न वापरण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याने आम्ही मातीपासून मुर्ती तयार केलेल्या आहेत. यंदा शाळू माती सुध्दा महाग झाल्याने यंदा गणेश भक्तासमोर महागाईचे. विघ्न उभे ठाकले आहेत..एवढेच. नव्हे तर रंगासह सर्वच साहित्य महागले आहेत. त्यामुळे मुर्तिचे भाव.थोड्या प्रमाणात वाढले आहेत. परंतु गणेश भक्तांनी.मुर्तिकार लोकांच्या भावना. समजून थोडी. महागाईची झळ सोसावी, असे माझे वैयक्तिक. मत आहेत.
निलेश रामचंद्र जयसिंगपुरे
मुर्तीकार.महादेव. वार्ड आर्वी
……………………