निवड / नियुक्ती / सुयश

प्रभात चे डॉ. गजानन नारे यांचा जागर तर्फे सत्कार

Spread the love

रितेश टीलावत
 अकोला

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे 51 लाखाचे पारितोषिक प्राप्त प्रभात किड्स स्कूलचे संस्थापक संचालक आणि विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेचे पदसिध्द सदस्य, जागर फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. गजानन नारे व प्रभात परिवाराचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण शिक्षण व कुशल शैक्षणिक व्यवस्थापनाने अकोल्यातील ‘प्रभात’ शाळेला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त मिळाल्याने सर्वच स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.

जागर फाउंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना डॉ. गजानन नारे व प्रभात परिवाराचे महत्वपूर्ण योगदान असते. प्रभात किड्सने माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला हा पुरस्कार जागर फाउंडेशनसाठी भूषणावह असल्याचे विचार जागर फाउंडेशनच्या सहयोजक डॉ.नंदकिशोर चिपडे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने तुळशिदास खिरोडकार, समीर शिरवळकर, अभिषेक उदावंत, कौशिक पाठक, निशिकांत बडगे, डॉ. आर. एफ. सय्यद, डॉ. सरोदे, प्रमोद देशमुख, डॉ. सुहास उगले व जागर फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close