विदेश

तिचा नकार ऐकून तों इतका विचलित झाला की सरळ बॉर्डर क्रॉस करत भारतात घुसला 

Spread the love
 

बाडमेर / नवप्रहार डेस्क 

              प्रेमात मनुष्य आंधळा होतो हे ऐकले आहे. पण प्रेमात मनुष्य इतका आंधळा होईल की तों बॉर्डर क्रॉस करून सरळ भारतात घुसेल हा विचार तुम्ही केला नसेल.. परंतु असा प्रकार घडला आहे. पाकिस्तान मधील एक युवक आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या गांवात गेला.  आणि त्याने मुलीला  आपण पळून जाऊन लग्न करू असे म्हटले. पण तिने नकार दिला.ही बाब मुलीच्या कुटुंबियांना माहित झाल्याने तरुणाने पळ काढला. तों प्रेयसीच्या नकाराने इतका विचलित झाला की सरळ पाकिस्तान ची सीमा ओलांडत भारतात घुसला. 

त्याचं झालं असं की, पाकिस्तानातील थारपारकर येथील एका तरुणाचं आपल्याच देशात राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होतं, मात्र मुलीने प्रेम करण्यास नकार दिल्याने तरुणाला राग आला आणि रागाच्या भरात चालत चालत त्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि भारतात आाला. आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपण ओलांडून 15 किलोमीटर आत असलेल्या एका भारतीय गावात पोहोचला. पोलीस आणि BSF ने ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याची ही लव्ह स्टोरी उघड झाली. आता हा तरुण पोलिसांच्या ताब्यात असून गुप्तचर यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर हे प्रकरण चर्चेत असून लोकांना या प्रेमकथेची खूप उत्सुकता आहे. बाडमेरचे पोलीस अधीक्षक नरेंद्रसिंह मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने 24 ऑगस्टच्या मध्यरात्री आणि 25 ऑगस्टच्या पहाटे आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडल आणि तो भारतातील झरपा गावात आाला हे झरपा गाव सीमारेषेपासून सुमारे 15 किमी आत आहे. तिथे त्याने थारपारकरला (पाकिस्तानात) जाणाऱ्या बसची चौकशी केली असता गावकऱ्यांना शंका आली. त्यांनी या तरुणाबद्दल बीएसएफ आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाला पकडून चौकशी केली तेव्हा धक्कादायक खुलासे झाले.

मैत्रिणीच्या घरी गेला, तिने नाकारल्यावर सीमेचं कुंपण ओलांडलं

पोलीस अधीक्षक नरेंद्रसिंह मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव जग्सी कोली आहे. तो पाकिस्तानातील थारपारकर जिल्ह्यातील अकली खरोरा गावचा रहिवासी आहे. हे गाव भारत-पाकिस्तान सीमेपासून 35 किमी अंतरावर आहे. त्याच्या 17 वर्षीय मैत्रिणीचे घर थारपारकर जिल्ह्यातील घोरमारी गावात आहे. हे गाव नवातला सीमेपासून 7 किमी अंतरावर आहे. 24 ऑगस्टच्या रात्री जगसी आपल्या मैत्रिणीच्या घरी भेटायला गेला होता.

जग्सीने आपल्या मैत्रिणीला सांगितलं की, पळून जाऊ आणि लग्न करू या. प्रेयसीने नकार दिला. दरम्यान प्रेयसीच्या घरच्यांना या प्रकरणाची कल्पना आली आली म्हणून जगसी तिथून पळून गेला. प्रेयसीने नाकारल्यामुळे जगसी च्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला, असं भारतीय पोलिस तपासात समोर आलं आहे.

प्रेयसीच्या ओढणीने घेणार होता फास; पण फांदीच तुटली…

मैत्रिणीच्या घरातून पळून जाताना त्याने तिला तिची ओढणी आठवण म्हणून मागितली होती. ही ओढणी झाडाच्या फांदीला बांधून गळफास घ्यायचा त्याने प्रयत्न केला. मुलीचे कुटुंबीय पाठलाग करतील, अशी भीती त्याला वाटत होती. म्हणून त्याने टोकाचा पर्याय स्वीकारला. पण त्याने ज्या झाडाला ओढणी बांधली होती त्या झाडाची फांदी तुटली आणि त्यामुळे त्याचा गळफास निसटला. या सगळ्या प्रकाराने घाबरलेला आणि बावचळलेला जगसी अंधारातच चालू लागला. 24 ऑगस्टच्या रात्री 12 च्या सुमारास त्याने तारेचं कुंपण ओलांडून सीमा पार केली.

थारपारकरला जाण्यासाठी बस विचारली आणि पकडला गेला

25 ऑगस्ट रोजी सकाळी भानावर आल्यावर जगसी बाडमेरच्या सेडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाडपा गावात बसची चौकशी करत होता. थारपारकरला (पाकिस्तान) जाण्यासाठी बस कुठून सुटते असा प्रश्न तो लोकांना विचारत होता. लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत. पण माणूस प्रेमात किती आंधळा होतो याचं उदाहरण म्हणून जगसीची कहाणी सीमेजवळच्या गावातील लोक आता चवीने चघळत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close